महाडीबीटी पोर्टलचा शेतकऱ्यांना फायदाच; अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज केलेल्या ८४३ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांना कृषी संबंधित सर्व योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी कृषी विभागातर्फे (The Department of Agriculture) महाडीबीटी पोर्टलवर (the MahaDBT portal) संगणक प्रणाली विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यासाठी (subsidized seeds) ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. याची अंतिम मुदत २४ मे पर्यंत होती.

  भंडारा (Bhandara).  शेतकऱ्यांना कृषी संबंधित सर्व योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी कृषी विभागातर्फे (The Department of Agriculture) महाडीबीटी पोर्टलवर (the MahaDBT portal) संगणक प्रणाली विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यासाठी (subsidized seeds) ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. याची अंतिम मुदत २४ मे पर्यंत होती.

  जिल्ह्यातील ८४३ शेतकऱ्यांनी भात, तूर पिकाच्या अनुदानित बियाण्यासाठी कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज (applied online) केले होते. यापैकी सर्वच शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्याची लॉटरी लागली आहे.

  शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत भात, तूर पिकाचे बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना तालुकास्तरावर कृषी सहाय्यक मार्फत बियाण्याचे परमिट दिले आहे. यावर्षी शेतकऱ्यांना प्रथमच राज्यस्तरावरून ऑनलाईन सोडत पद्धतीने सवलतीच्या दरात बियाणे मिळणार आहे.

  खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे मिळणार म्हणून मे महिन्यात ऑनलाईन अर्ज भरला होता. मात्र यावेळी अनेकदा अडचण आली. त्यानंतर दोन दिवसांनी अर्ज मंजूर झाला. आता बियाण्यासाठी लॉटरीत नंबर लागला आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात बियाणे मला मिळेल याचा आनंदच आहे.
  -विनीत धर्मकार, शेतकरी, भंडारा

  कृषी विभागाच्या अनुदानित बियाण्यासह यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज भरला होता. त्यानंतर आता अनुदानित बियाण्यासाठी नंबर लागल्याचा संदेश आला आहे. बियाणे मिळणार आहे, मात्र मला यांत्रिकीकरण योजनेचा संदेश मात्र अजूनही आलेला नाही.
  – मदनकर, शेतकरी, सिरसी