आमदाराच्या लहान भावाचा भीषण अपघातात मृत्यू

  • आमदार राजू कोरमोरे यांचे लहान भाऊ बालू कोरमोरेंचा शुक्रवारी रात्री कार अपघात झाला. ते राईस मिल येथून आपल्या घराच्या दिशेने जात होते. भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात इतकी भीषण होता की, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच गाडीचा चक्काचूर झाला आहे.

भंडारा – भंडारामधील आमदार राजू कोरमोरे यांचा लहान  भाऊ बालू(रामेश्वर) कोरमोरे यांचे अपघातात निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बालू कोरमोरे हे आपल्या चारचाकी वाहनातून वरठीतल्या राईस मिल मधून घरी परतत होते. या दरम्यान त्यांचा भीषण अपघात झाला. आपघातात बालू कोरमोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

आमदार राजू कोरमोरे यांचे लहान भाऊ बालू कोरमोरेंचा शुक्रवारी रात्री कार अपघात झाला. ते राईस मिल येथून आपल्या घराच्या दिशेने जात होते. भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात इतकी भीषण होता की, यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच गाडीचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस घटना स्थळी रवाना झाले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह जवळील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या ट्रकला ताब्यात घेतले आहे. तसेच सर्व प्रत्यक्षदर्शींचा चौकशी केली जाणार आहेत. अपघात कसा झाला याची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. अपघात झालेल्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसांनी अपघाती वाहनांना रस्त्याच्या बाजूला करण्यात आले आहे.