You too will be disgusted to see the filthy glory of this Panipuriwala

भेंडाळा येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. बाजारातील पाणीपुरीच्या ठेल्यावर विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी पाणीपुरी खाल्ली. यात ज्ञानेश्वरीचाही समावेश होता. यानंतर रात्री या सर्वांना हगवन आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी आसगाव येथील खासगी दवाखान्यात धाव घेतली. दवाखान्यात प्राथमिक उपचार करून सर्वजण घरी परतले. मात्र, मंगळवारी सकाळी राखीची प्रकृती अचानक खालावली. उपचारासाठी तिला पवनी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

    भंडारा : पाणीपुरी खाल्ल्याने झालेल्या विषबाधेमुळे एका 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे घडली. ज्ञानेश्वरी उर्फ राखी रामदास सतीबावणे (12) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.

    भेंडाळा येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. बाजारातील पाणीपुरीच्या ठेल्यावर विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी पाणीपुरी खाल्ली. यात ज्ञानेश्वरीचाही समावेश होता. यानंतर रात्री या सर्वांना हगवन आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी आसगाव येथील खासगी दवाखान्यात धाव घेतली. दवाखान्यात प्राथमिक उपचार करून सर्वजण घरी परतले. मात्र, मंगळवारी सकाळी राखीची प्रकृती अचानक खालावली. उपचारासाठी तिला पवनी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

    यानंतर पाणीपुरी खाणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचेही धाबे दणाणले. राखीचा पाणीपुरीतून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, त्यापैकी काहींनी पवनी ग्रामीण रुग्णालय, तर काहींनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली.

    पवनी आणि भंडारा येथे 40 जणांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, ज्ञानेश्वरीची आई अर्चना व बहीण श्रुतीनेदेखील बाजारातील पाणीपुरी खाल्ली होती. यामुळे त्यांचीही प्रकृती अत्यावस्थ असून आईवर पवणी ग्रामीण रुग्णालयात तर बहिणीवर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.