प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पूर्वी संवादाचे व ख्याली, खुशाली जाणून घेण्याचे पोस्टकार्ड हे एकमेव प्रभावी साधन होते. पत्राव्दारे भावनांचे आदानप्रदान व्हायचे. मात्र, आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही पोस्टकार्ड दिसेनासे झाले आहे. त्यामुळे पत्र टाकण्यासाठी असलेल्या टपाल विभागाच्या लाल पत्रपेटी इतिहास जमा होऊ लागल्या आहेत.

    गोंडउमरी (Gondumari).  पूर्वी संवादाचे व ख्याली, खुशाली जाणून घेण्याचे पोस्टकार्ड हे एकमेव प्रभावी साधन होते. पत्राव्दारे भावनांचे आदानप्रदान व्हायचे. मात्र, आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही पोस्टकार्ड दिसेनासे झाले आहे. त्यामुळे पत्र टाकण्यासाठी असलेल्या टपाल विभागाच्या लाल पत्रपेटी इतिहास जमा होऊ लागल्या आहेत.

    लहानपणी मामांचे पत्र हरवले ते आम्हाला सापडले या खेळाचा आनंद निराळाच होता. परंतु येणाऱ्या पिढीला पत्र म्हणजे नेमके काय असते? हे समजेनासे झाले आहे. त्यांना पत्रलेखनाची पद्धतीही माहित नाही. पूर्वी संवादाचे सशक्त साधन असलेले पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र आता कोणीही वापरताना दिसत नाही. त्यामुळे नव्या पिढीतील मुलांना त्यांचे उपयोग व महत्त्व माहीत नाही. पत्र टाकण्यासाठी टपाल विभागाने ठिकठिकाणी लावलेल्या लाल रंगाच्या टपालपेट्यांना आता भंगार रुप आले आहे.

    आजच्या युगात संगणक व मोबाईल हेच संवादाचे प्रभावी माध्यम बनले आहे. पूर्वी पत्रव्यवहारासाठी पत्रपेटीचा वापर होत होता. परंतु आता सर्व पत्रव्यवहार ई-मेल, व्हाट्सअप च्या माध्यमातून होत आहेत. त्यात अनेक खासगी कुरियर कंपन्याही आल्या आहेत. जलद गतीने पत्र आणि पार्सल पोहोचावे म्हणून अनेकांचा कल कुरियर कडे असतो. त्यामुळे पत्रव्यवहार संपुष्टात आला आहे.

    पूर्वी संवादाचे व ख्याली, खुशाली जाणून घेण्याचे पोस्टकार्ड हे एकमेव प्रभावी साधन होते. पत्राव्दारे भावनांचे आदानप्रदान व्हायचे. मात्र, आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही पोस्टकार्ड दिसेनासे झाले आहे.