पंक्चर झालेल्या गाडीवर डबलशीट बसूनही प्रवास; विदर्भातील संशोधकाचा दावा

दुचाकीचा ट्युबलेस टायर (The bike tubeless tire) पंचर झाला तरी काही अंतरावर चालतो. पण पंचर दुचाकीवर (Puncher two-wheeler) दोघे गाडीने जाऊ शकत नाही. समजा गेले तरी टायरला छोटे छोटे अनेक पंक्चर होतील. अल्पावधितच टायर बदलवावा लागेल.

    भंडारा (Bhandara). दुचाकीचा ट्युबलेस टायर (The bike tubeless tire) पंचर झाला तरी काही अंतरावर चालतो. पण पंचर दुचाकीवर (Puncher two-wheeler) दोघे गाडीने जाऊ शकत नाही. समजा गेले तरी टायरला छोटे छोटे अनेक पंक्चर होतील. अल्पावधितच टायर बदलवावा लागेल. या समस्येला कंटाळून तालुक्यातील मोहरणा येथील एका अभियंत्याने पंक्चर फ्री रसायन (puncture free chemical) तयार केले. पंक्चरची समस्याच सोडविली नाही तर आपल्या गावातच अर्थार्जनाचा मार्गही शोधला. भागवत राऊत (Bhagwat Raut) असे या संशोधकाचे नाव असून नवनवीन रसायन तयार करण्यासाठी संशोधन करीत आहे.

    सध्याचे युग हे यांत्रिकीकरणाचे युग आहे. या युगातील प्रत्येक व्यक्ती धडपडत असल्याचे दिसून येते. कोणी रोजगारासाठी, कोणी नोकरीसाठी, तर कोणी जगण्यासाठी धडपडतानाचे दिसतात. भागवतचे प्राथमिक शिक्षण मोहरणा या गावी झाले. १२ वीपर्यंतचे शिक्षण ब्रम्हपुरी येथे झाले. छत्तीसगढ राज्यातील भिलाई येथील स्वामी विवेकानंद विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजमधून मेकॅनिकल शाखेत अभियांत्रिकी केली. ग्रामीण भागातील एका तरूणाने अभियांत्रीकीचे शिक्षण पूर्ण केले. जिज्ञासू व संशोधक वृत्ती असणाऱ्या भागवतने महाविद्यालयीन जीवनात ध्वनीच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याचा अफलातून प्रयोग केला होता.


    खासगी कंपनीत काही काळ नोकरी केली. मात्र त्याचे मन महानगरात रमत नव्हते. त्यातच कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. नोकरी सोडून त्याने थेट मोहरणा गाठले. सुरूवातीला गावातील लोकांनी त्याला वेड्यात काढले. ‘पण तो डगमगला नाही. आपले संशोधन सुरू ठेवले. लॉकडाऊन दरम्यान त्याने बाहेरुन विविध कच्ची सामुग्री बोलवुन पंक्चर फ्री रसायन तयार केले. त्याच्या संशोधनाने ग्रामीण भागातील दुचाकी पंक्चरची समस्या काही अंशी सुटली.

    रसायन असे करते काम
    ट्यूब लेस टायरच्या गोट मधून हवा लीक होणे, दुरुस्त केलेल्या पंचरच्या दोरीतून हवा लिक होणे, छोट्या-छोट्या छिद्रामधून हवा जाणे, हवा कुठून जाते ते माहितीही होत नाही. यामुळेच दुचाकीधारकाला विविध समस्यांचा समाना करावा लागतो. पंक्चर झाल्यानंतर भागवतने तयार केले रसायन टायरमध्ये टाकल्यानंतर पंक्चर असेल तर तो दुरुस्त होतो. टायरला असणार छोट्या छिद्रातून रसायन बाहेर येऊन छिद्र बुजविण्याचे काम करते. टायरमध्ये सुरुवातीपासूनच रसायन टाकून ठेवले तर टायर पंचर होत नाही. परिणामी टायरची आयुमर्यादादेखील वाढते, रसायन तब्बल तीन वर्षापर्यंत टायरला सुरक्षा देत असल्याची माहिती अभियंता भागवत राऊत यांनी दिली आहे.