अल्पवयीन मुलीला जंगलात ओढत नेऊन केला बलात्कार; भंडारा जिल्ह्यात खळबळ

दोघांनी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवरुन जंगल परिसरात घेऊन गेले. यावेळी मुलीवर अत्याचार करण्यात आला. घटनेची माहिती अल्पवयीन मुलीने सबंधित अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली.

    लाखांदूर (Lakhandur) : लगतच्या जिल्ह्यातून दुचाकीने स्थानिक लाखांदूरात (a local Lakhandur) येऊन एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला (the victim minor girl) जीवे मारण्याची धमकी (threatened with death) देत जंगल परीसरात नेऊन सामूहिक अत्याचार (Gang Rape) केला. ही घटना गत १९ ऑगस्ट रोजी सायंकाळ ५ वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील चिचोली जंगल परीसरात (Chicholi forest area) घडली.

    पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी युवकांविरोधात अत्याचार गुन्ह्यासह पोक्सो कायद्याअंतर्गत (the Pokso Act) गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    समीर आबाजी झाहारे (२२) व सुरज प्रभाकर मेश्राम (२१) दोन्ही रा. मालडोंगरी(ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर) अज्ली आरोपीतांची नावे आहेत. पोलीस सुञानुसार, घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपी विना क्रमांकाच्या दुचाकीने लाखांदूरात आले. दोघांनी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवरुन जंगल परिसरात घेऊन गेले. यावेळी मुलीवर अत्याचार करण्यात आला. घटनेची माहिती अल्पवयीन मुलीने सबंधित अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली.

    सदर माहितीवरुन तब्बल दोन दिवसानंतर पिडीत अल्पवयीन मुलीसह कुटुंबियांनी गत २१ ऑगस्ट रोजी लाखांदूर पोलीसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन लाखांदूर पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे. तपास पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधु व लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करीत आहेत.