शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; प्रशासनाचे दुर्लक्ष

शिक्षण संस्थांजवळ शंभर यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यात येऊ नये, असे शासनादेश असताना नियमाला हरताळ फासून लाखांदुरात चक्क महाविद्यालय व पोलिस स्टेशनच्या गेटमध्येच तंबाखूची सर्रास विक्री होताना दिसत आहे.

    लाखांदूर (Lakhandur).  शिक्षण संस्थांजवळ शंभर यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यात येऊ नये, असे शासनादेश असताना नियमाला हरताळ फासून लाखांदुरात चक्क महाविद्यालय व पोलिस स्टेशनच्या गेटमध्येच तंबाखूची सर्रास विक्री होताना दिसत आहे.

    सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा 2003 मधील कलम 6 (ब) नुसार कोणतीही शाळा, महाविद्यालय वा शिक्षण संस्थेच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीला बंदी आहे. यात सिगारेटचाही समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात लाखांदुरातील जिल्हापरिषद महाविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ किराणा व्यावसायिकांकडून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सर्रास होताना दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी शहरातील काही सुजान नागरिकांकडून केली जात आहे.