Devendra-Fadvanis

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. 'भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० बालकांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खदायक आणि व्यथित करणारी आहे.

भंडारा : भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक, प्रगतीशील महाराष्ट्रात १० नवजात बालकांचा मृत्यू आयसीयू मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे. फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखाची मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ‘भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० बालकांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खदायक आणि व्यथित करणारी आहे. या घटेनमध्ये बळी ठरलेल्या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या घटनेची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबियांवर हे दुःख कोसळलं त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे. असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच संध्याकाळी ५ वाजता आरोग्यमंत्री स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत.