Ten infants die in fire at Bhandara District Hospital's child care unit Chief Minister Uddhav Thackeray's inquiry order

चौकशीत नवजात शिशुंना ज्या इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते तेच सदोष असल्याचे आढळून आले आहे.ज्या इनक्युबेटरचा स्फोट झाला, त्याची थ्री पिन, वायर ज्या स्वीचवर लावण्यात आली होती. ते स्वीच आणि वायरिंग असलेले पाईप जळल्याचे निदर्शनाला आले नाही. पहिल्या इनक्युबेटरचे तापमान नियंत्रित झाले नाही, त्यामुळे त्याचा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे त्या इन्क्युबेटरच्या ठिकऱ्या झाल्या. त्यातील लहान शिशूचे अवयवदेखील हाती आले नाहीत.

भंडारा : महाराष्ट्राला हादरवणारी घटना शनिवारी मध्यरात्री भंडाऱ्यात घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. या अग्नीकांडाबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी समिती नेमली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने प्राथमिक पाहणी अहवाल तयार केला आहे.

या चौकशीत नवजात शिशुंना ज्या इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते तेच सदोष असल्याचे आढळून आले आहे.ज्या इनक्युबेटरचा स्फोट झाला, त्याची थ्री पिन, वायर ज्या स्वीचवर लावण्यात आली होती. ते स्वीच आणि वायरिंग असलेले पाईप जळल्याचे निदर्शनाला आले नाही. पहिल्या इनक्युबेटरचे तापमान नियंत्रित झाले नाही, त्यामुळे त्याचा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे त्या इन्क्युबेटरच्या ठिकऱ्या झाल्या. त्यातील लहान शिशूचे अवयवदेखील हाती आले नाहीत.

स्फोटामुळे खोलीमध्ये धूर पसरला. दरवाजा बाहेरून बंद होता. तो उघडला गेला नाही आणि धुरामुळे इतर बालके दगावली. यातून आणखी बाबी समोर येतील. मात्र, प्राथमिक पाहणी अहवालाने इनक्युबेटर खरेदीचे वास्तव समोर आणले आहे.