
महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी पाणी करणारी दुख:द घटना आज भंडाऱ्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मृत बालकांच्या मातांचा आक्रोश पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सर्वत्र शोककळा पसरली आहे. मृत बालाकांच्या कुटुंबियांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत.
भंडारा : महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी पाणी करणारी दुख:द घटना आज भंडाऱ्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मृत बालकांच्या मातांचा आक्रोश पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सर्वत्र शोककळा पसरली आहे. मृत बालाकांच्या कुटुंबियांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत.
रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. ‘आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, आमची लेकरं गेली’ असं म्हणत मृत बालकांच्या मातांनी टाहो फोडला.
रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळंच ही घटना घडल्याचे म्हणत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान, मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तर,राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख स्वत: घटनास्थळी जाऊन चौकशी करणार आहेत.