Ten infants die in Bhandara district hospital fire; Home Minister Anil Deshmukh will go to the spot and investigate

महाराष्ट्राला हादरवणारी घटना भंडाऱ्यात घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणेबाबत प्रश्नचिश्न निर्माण झाले असून या बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख स्वत: घटनास्थळी जाऊन चौकशी करणार आहेत. गृहमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी घटना भंडाऱ्यात घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणेबाबत प्रश्नचिश्न निर्माण झाले असून या बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख स्वत: घटनास्थळी जाऊन चौकशी करणार आहेत. गृहमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज मी स्वतः घटनास्थळी भेट देणार आहे असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

रात्री दोन वाजेच्या सुमारास भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आले. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर दिसला. नर्सने तात्काळ ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली.

या नंतर अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.