शहरात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय फोफावला; शुध्द व थंड पाण्याची मागणी वाढली

पाणीटंचाई व शुध्द पाण्याची मागणी लक्षात घेता शहरात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. केवळ श्रीमंताच्या घरी दिसणारी शुध्द पाण्याची कॅन आता गाव, खेड्यापर्यंत पोहचल्या आहेत. शहरातील नामवंत लोकांच्या घरी मंगलकार्याप्रसंगी थंड पाण्याची कुलकेज आता गरीबांच्या समारंभात दिसत आहेत.

    भंडारा (Bhandara). पाणीटंचाई व शुध्द पाण्याची मागणी लक्षात घेता शहरात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. केवळ श्रीमंताच्या घरी दिसणारी शुध्द पाण्याची कॅन आता गाव, खेड्यापर्यंत पोहचल्या आहेत. शहरातील नामवंत लोकांच्या घरी मंगलकार्याप्रसंगी थंड पाण्याची कुलकेज आता गरीबांच्या समारंभात दिसत आहेत. वाढत्या उन्हामुळे हा व्यवसाय तेजीत आला आहे.

    केवळ लग्न समारंभासाठीच नव्हे तर लहान मोठ‌या कार्यक्रमातही एवढेच नाही तर महाप्रसादाच्या कार्यक्रमातही शुध्द व थंड पाण्याची मागणी वाढली आहे. केवळ उन्हाळ्यामध्ये चालणारा व्यवसाय आता बारमाही चालू असतो. शुध्द पाण्याचा वापरही गाता गरजेची बाब झाली आहे. लग्नात हौसेच्या खर्चाला फाटा देऊन प्रत्येकजण शुध्द पाण्याचा आग्रह धरताना दिसून येत आहे.

    या व्यवसायासाठी परिसरात डझनभर व्यवसायिक तयार झाले आहेत. प्रत्येक बाबतीत सोहळ्यात टापटीपपणा दिसून यावा, पाहुण्याची उत्तम व्यवस्था व्हावी म्हणून कॅनच्या पाण्याला आग्रह वाढले असल्याचे दिसून येते. लग्न कार्यात वधुपक्षाला शुध्दतेच्या नावाखाली भुर्दंड सहन करावा लागत आहे.