गावाकडे परतलेल्या मजुरांचे हालच; हाताला कामच नसल्याने जगायचे तरी कसे? मजुरांना सतावतोय प्रश्न

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत गेल्याने (in the state due to the increasing prevalence of corona.) संचारबंदी लागू झाली. बांधमामे, कंपन्या आणि दुकाने बंद झाल्याने (The closure of constructions, companies and shops has raised) मजुरांच्या जीवन मरणाचा प्रश्न (the question of life and death of the workers) निर्माण झाला आहे. शहरातील किरायचे घर आणि कामाअभावी रोजची होणारी उपासमार टाळण्यासाठी (to avoid the daily starvation) मजुरांच्या लोंढ्यांनी पुन्हा गावाची वाट धरली.

    सिहोरा (Sihora) :  राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत गेल्याने (in the state due to the increasing prevalence of corona.) संचारबंदी लागू झाली. बांधमामे, कंपन्या आणि दुकाने बंद झाल्याने (The closure of constructions, companies and shops has raised) मजुरांच्या जीवन मरणाचा प्रश्न (the question of life and death of the workers) निर्माण झाला आहे. शहरातील किरायचे घर आणि कामाअभावी रोजची होणारी उपासमार टाळण्यासाठी (to avoid the daily starvation) मजुरांच्या लोंढ्यांनी पुन्हा गावाची वाट धरली; गावात रोजगार हमी योजना आणि शेतीच्या कामांचा आपल्याला आधार (the employment guarantee scheme and agricultural work in the village) होईल, असे त्यांना वाटायचे. पण गावात पोहोचल्यावर ठप्प पडलेल्या कामांमुळे येथेही उपासमार सहन करावी लागत आहे.

    राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताच शेकडो मजुरांनी दुसऱ्या लाटेत गावाकडे धाव घेतली. पहिल्या लाटेत अनेकांना वाहनांअभावी पायी यावे लागले होते. यावेळेस वाहनांची सुविधा होती. परंतु, आता गावात काम मिळणे कठीण झाले आहे. तुमसर तालुक्‍यातील सिहोरा-बपेरा परिसरातून शेकडो मजूर कामाच्या शोधात नागपूर, मुंबईसह विविध ठिकाणी जातात. परंतु, गत वर्षापासून कोरोना संसर्गामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    राज्य शासन कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंभीर असले तरी, नागरिकांना मात्र वाऱ्यावर सोडत आहे. पहिल्या लाटेत गावातच रोजगार प्राप्त झाले होते. रोजगार हमी योजना आणि शेतीची कामे सुरू होती. शहरातून गावात परतलेल्या मजुरांना गावकऱ्यांनी आधार व आसरा दिला होता. परंतु, अधिक दिवस रोजगार उपलब्ध झाला नसल्याने पुन्हा मजुरांचे लोंढे नागपूरच्या दिशेने निघाले होते. नागपुरात काम करून संसाराचा गाडा रेटू लागले.