आंघोळीसाठी गेलेल्या चौघा मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू; धक्कादायक होता शेवट

भटकंती करून परत येत असताना त्यांना जवाहरनगर ते नांदोरा झिरी या रस्त्यावरील नहरालगत एक छोटे तलाव दिसले. अवैध मुरुमाचे उत्खनन केल्याने झालेल्या या तलावातील खोल पाण्याचे त्यांना अंदाज आले नाही आणि त्यांना आंघोळीचा मोह आवरता आला नाही.

    भंडारा (Bhandara) : आंघोळीसाठी गेलेल्या चौघा मित्रांपैकी एकाचा करुण अंत झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर परिसरातिल नांदोरा झिरी जवळील मुरुम खदानीत घडली आहे. सौरभ राजेंद्र गजभिये वय १८ वर्ष असे मृतक मुलाचे नाव आहे.

    परसोडी येथील मृतक सौरभ राजेंद्र गजभिये व इतर तिघे असे चौघे मित्र नांदोरा झिरी या पर्यटनस्थळी भटकंती करायला गेले होते. भटकंती करून परत येत असताना त्यांना जवाहरनगर ते नांदोरा झिरी या रस्त्यावरील नहरालगत एक छोटे तलाव दिसले. अवैध मुरुमाचे उत्खनन केल्याने झालेल्या या तलावातील खोल पाण्याचे त्यांना अंदाज आले नाही आणि त्यांना आंघोळीचा मोह आवरता आला नाही.

    अंदाज नसतानासुद्धा चौघेही मित्र एकमेकांचा हात पकडून खोल पाण्यात आंघोळीसाठी गेले. दरम्यान, अचानक सौरभ ख़ोल पाण्यात बुचकळ्या मारु लागला इतर तीन मित्रांनी वाचवण्यासाठी आरडाओरडा करु लागले. मदतीसाठी नागरिक धावून आले खरे. मात्र, तोपर्यत्न सौरभ राजेंद्र गजभिये या युवकाचा अंत झाला. सौरभ याचे शव भंडारा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविन्यात आले आहे. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सौरभच्या दुर्देवी मृत्युने परसोडी गावात शोककळा पसरली आहे.