‘ते’ सराफा दुकान उघडण्यात व्यस्त होते; चोरट्यांनी केली ७० लाखांच्या मुद्देमालाची चोरी

दुकानाचे मालक सोमवारी सकाळी दुकान उघडताना त्यांनी सोन्या-चांदीच्या ऐवजाने भरलेली बॅग बाजूला ठेवली होती. ते शटर उघडण्याच्या कामात गुंतले असल्याचे पाहून दोन चोरांनी त्यांची बॅग उचलून दुचाकीने नागपूरच्या दिशेने पळ काढला.

    भंडारा (Bhandara) : चोरटे (thieves) चोरीसाठी (to steal) नवनवीन शक्कल शोधत असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान भंडारा शहरात (in Bhandara city) एका अज्ञात चोरट्याने (an unidentified thief) सराफा दुकानदाराची (a bullion shopkeeper) 70 लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरून नेली. ठाणा पेट्रोल पंपाजवळील (Thana petrol pump) स्वाती ज्वेलर्सचे दुकानदार आज सकाळी 10ः30 वाजता दुकानाचे शटर उघडण्यात व्यस्त होते. चोरट्याने या संधीचा फायदा उचलून दुकानमालकाची बॅग चोरून नेली. (The thief stolen the Gold and silver shop owner’s bag in Bhandara City)

    माहितीप्रमाणे, दुकानाचे मालक सोमवारी सकाळी दुकान उघडताना त्यांनी सोन्या-चांदीच्या ऐवजाने भरलेली बॅग बाजूला ठेवली होती. ते शटर उघडण्याच्या कामात गुंतले असल्याचे पाहून दोन चोरांनी त्यांची बॅग उचलून दुचाकीने नागपूरच्या दिशेने पळ काढला. भंडारा शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली. तुर्तास पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आपपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस चोरट्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.