कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी; शेतकरी चिंतेत

पवनी तालुकात मध्यतरी कांद्याचे भाव वाढल्याची सर्वत्र ओरड होती. या कांद्यांनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले होते. मात्र, सद्यःस्थितीमध्ये कांद्याचे भाव कमालीचे गडगडले आहेत.

    पवनी (Pawani).  मध्यतरी कांद्याचे भाव वाढल्याची सर्वत्र ओरड होती. या कांद्यांनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले होते. मात्र, सद्यःस्थितीमध्ये कांद्याचे भाव कमालीचे गडगडले आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. परंतु, भाव पडल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी विवंचनेत आहेत.

    सध्या किरकोळ बाजारात कांदा वीस रुपये किलो भावाने विक्री केला जात आहे. गतपावसाळ्यात राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडला. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाल्याने मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात कांद्यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र, आता उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाला आहे; परंतु या कांद्याला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे किरकोळ बाजारात कांदा वीस ते पंचवीस रुपये किलोने विक्री केला जात आहे. त्यामुळे या कांद्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.