शेतात चिखलणी करताना ट्रॅक्टर उलटला; चालकाचा दबून मृत्यू

धान रोवणीसाठी (planting paddy) शेतात चिखलणी करताना ट्रॅक्‍टर उलटून चालक जागीच ठार झाला. ही घटना तालुक्‍यातील मडेघाट येथे सोमवारी दुपारी १ वाजता घडली. संदिप आंदराव ढोरे (२८) रा. कन्हाळगाव असे मृताचे नाव आहे.

    भंडारा (Bhandara). धान रोवणीसाठी (planting paddy) शेतात चिखलणी करताना ट्रॅक्‍टर उलटून चालक जागीच ठार झाला. ही घटना तालुक्‍यातील मडेघाट येथे सोमवारी दुपारी १ वाजता घडली. संदिप आंदराव ढोरे (२८) रा. कन्हाळगाव असे मृताचे नाव आहे. मडेघाट येथील बालू राऊत यांच्या शेतात धान रोवणीसाठी सोमवारी ट्रॅक्‍टरने चिखलणी काम सुरु होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास ट्रॅक्‍टर चिखलात अडकला.

    चालक संदिपने ट्रॅक्‍टरच्या मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्‍टर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला. त्यात ट्रॅक्टखाली चालक संदिप दबल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती हेतशिवारातील होताच अनेकांनी शेतात धाव घेतली. लाखांदूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी ट्रॅक्टरखाली दबलेला मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा केला. या आकस्मिक अपघातीमृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.