सेल्फीच्या नादात दोन भावंडांनी जीव गमावला; गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू

    भंडारा (Bhandara): पवनी तालुक्यातील (Pavani taluka) गोसेखुर्द प्रकल्पाच्या (Gosekhurd project) पावर हाउस (The power house) पाण्यात उतरून सेल्फी घेणे दोन भावंडांना चांगलेच महागात पडले. दरम्यान पाय घसरून (slip and fall into the water) दोघेही पाण्यात पडले. दोघांपैकी एकालाही पोहता (swim) येत नसल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू (both of them drowned) झाला. रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

    विनोद मधुकर जुनघरे (35) आणि मंगेश मधुकर जुनघरे (37) अशी मृतकांची नावे आहेत. माहितीप्रमाणे दोघेही जण नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील रेवतकर ले आऊट भागातील रहिवासी होते. 15 ऑगस्ट असल्याने दोघेही भावंड गोसेखुर्द प्रकल्पावर पर्यटनासाठी आले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.