हॉटेलमध्ये दूषित पाण्याचा वापर; खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे साथीच्या रोगांना निमंत्रण

भंडारा शहरातील हॉटेलांमध्ये नागरिकांना पिण्यासाठी दूषित व खाऱ्या पाण्याचा उपयोग केला जात असल्याने शहरातील नागरिकांना पैसे देवून साथीच्या रोगाचे आमंत्रण मिळत आहे. हा सर्व प्रकार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या समोर उघडपणे पाहत असतानासुध्दा अधिकाऱ्यांचे हॉटेल मालकांना अर्थपूर्ण अभय असल्याचे दिसून येत आहे.

    भंडारा (Bhandara).  शहरातील हॉटेलांमध्ये नागरिकांना पिण्यासाठी दूषित व खाऱ्या पाण्याचा उपयोग केला जात असल्याने शहरातील नागरिकांना पैसे देवून साथीच्या रोगाचे आमंत्रण मिळत आहे. हा सर्व प्रकार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या समोर उघडपणे पाहत असतानासुध्दा अधिकाऱ्यांचे हॉटेल मालकांना अर्थपूर्ण अभय असल्याचे दिसून येत आहे.

    हॉटेलांमध्ये वापरण्यात येणारे पाणी हे दुषित व खारे आहेत. हॉटेलातील स्वयंपाकगृहामध्ये सुध्दा घाण कचरा तसेच हॉटेलमध्ये काम करणारे व्यक्तीसुध्दा अस्वच्छ राहत असल्यामुळे त्यांच्या हाताचे जीवाणु पाण्यात येतात. त्यामुळेही हॉटेलात येणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या व विविध खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे अनेक साथीच्या रोगाला समोर जावे लागत आहे.

    पावसाळ्याच्या दिवसात तर अनेक हॉटेलमध्ये परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे आढळून येते. हा सर्व प्रकार उघडपणे घडत असतानासुध्दा त्याकडे अन्नसुरक्षा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.