bhandara market

कोरोना संकटकाळात भाजीपाल्यासह किराणा साहित्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पंधरवड्यापूर्वी भाजीपाल्यासह किराणा साहित्याच्या दरात थोडीफार दरात तफावत दिसून येते. मात्र ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा महागाईने जनसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडविले आहे.

  • सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले

भंडारा. भाजीपाला, किराणा व फळांच्या किमतीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भंडारा  जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रासह अन्य जिल्ह्यातून भाजीपाल्यांची आवक होत असते. विशेषतः हिवाळा ऋतुच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण क्षेत्रातून भाजीपाल्यांची आवक वाढत आहे. मात्र हव्या त्या प्रमाणात भाजीपाल्यांचे दरही नियंत्रित दिसून येत नाहीत. बटाटे, कांदे, फूल कोबी, पत्ताकोबी, वांगे, भरतीचे वांगे, शिमला मिरची, वालाच्या शेंगा, कोथिंबीर, मिरची यासह अन्य भाजीपाल्यात दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. ही दरवाढ मागील काही दिवसांपासून आहे मात्र यात कुठलीही कमी न येताया उलट त्यात वाढ झाल्याचे दिसून येते.

तेलाच्या दरांमध्ये वाढ

दिवाळीची चाहूल लागल्यामुळे सध्या सणासुदीच्या काळात किराणा साहित्य अंतर्गत तेलाचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी तेलाचे भाव कमी झाले होते. मात्र गत आठवड्याभरात तेलाचे भाव आठ ते दहा रुपयांनी वधारले आहे. या सोबतच अन्य साहित्यातही थोडीफार वाढ झाल्याचे दिसून येत आहे.