धक्कादायक ! पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, मात्र..,’या’ कारणासाठी दोघांनीही घेतला टोकाचा निर्णय

पतीच्या निधनानंतर शेजाऱ्याशी पत्नीचे सूत जुळले. परंतु प्रेयसी वयाने मोठी असल्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध होण्याची भिती वर्तवली जात आहे. प्रेयसीला १४ वर्षांचा मुलगा आणि ११ वर्षांची मुलगी आहे. परंतु कुटुंबियांच्या विरोधामुळे आणि प्रेयसीच्या वयामुळे दोन्ही प्रेम युगुलांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.

    भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रूग्णालय वार्डातील धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने विधवा प्रेयसीसोबत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काही कारणास्तव दोघांनीही टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर शेजाऱ्याशी पत्नीचे सूत जुळले. परंतु प्रेयसी वयाने मोठी असल्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध होण्याची भिती वर्तवली जात होती. प्रेयसीला १४ वर्षांचा मुलगा आणि ११ वर्षांची मुलगी आहे. परंतु कुटुंबियांच्या विरोधामुळे आणि प्रेयसीच्या वयामुळे दोन्ही प्रेम युगुलांनी आत्महत्या केल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.

    दरम्यान, या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आत्महत्या करण्याचं यामागील नेमकं काय कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.