nitish kumar- upcoming election

नितीश कुमार(nitish kumar) यांना मुख्यमंत्री पद देण्याचे भाजपने मान्य केले होते. मात्र, आता नितीश कुमारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजप नेत्यांनी(bjp leaders) नितीश कुमारांची समजूत घातली. सलग चौथ्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप नेत्यांनी नितीश कुमार यांना राजी केले आहे. निवडणुकीतील(bihar election 2020) आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा आहे.

पाटणा : नितीश कुमार(nitish kumar) यांना मुख्यमंत्री पद देण्याचे भाजपने मान्य केले होते. मात्र, आता नितीश कुमारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजप नेत्यांनी(bjp leaders) नितीश कुमारांची समजूत घातली. सलग चौथ्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप नेत्यांनी नितीश कुमार यांना राजी केले आहे. निवडणुकीतील(bihar election 2020) आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा आहे.

बिहारमध्ये एनडीएला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. असे असताना नितीश कुमार मुख्यमंत्री होण्यास अनिच्छुक होते. आपल्या इच्छेनुसार सरकार चालवा असे म्हणत

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास तयार केले आहे. पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे सरकार चालवू शकता असे आश्वासनही भाजप नेत्यांनी नितीश यांना दिले आहे.

243 सदस्य असलेल्या बिहारमध्ये एनडीएने 125 जागांवर दणदणीत विजय मिळवला. मात्र, भाजपने 74 जागा जिंकल्याने त्यांचे पारडे जड झाले. तर जदयूला 43 जागांवर विजय मिळाला आहे. व्हीआयपी आणि हमला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहेत. 2015च्या विधानसभा निवडणुकीत जदयूने 71 जागांवर विजय मिळवला होता.