nitish kumar and shushil modi

नितीशकुमार यांनी सुशील मोदी यांच्यासह संजय झा यांना विधान परिषदेच्या समित्यांचे अध्यक्षपद सोपविले आहे. माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना आचार समिती तर माजी मंत्री संजय झा यांना याचिका समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.

पाटणा. नितीशकुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी सुशीलकुमार मोदी त्यांच्यासोबत नव्हते. भाजपा नेत्यांनी त्यांच्याऐवजी तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांना उपमुख्यमंत्रिपद बहा केले. सत्तेच्या  राजकारणात नितीश आणि सुशीलकुमार मोदींच्या मैत्रीची चर्चा नेहमीच होत असते. परंतु नवे सरकार स्थापन झाल्यानंतर दोनच दिवसानंतर नितीशकुमार यांनी मैत्रीला जागत सुशील मोदी यांच्याकडे नवी जबाबदारी सोपविली व आपल्यासोबतच राहतील अशी व्यवस्थाही केली.

नितीशकुमार यांनी सुशील मोदी यांच्यासह संजय झा यांना विधान परिषदेच्या समित्यांचे अध्यक्षपद सोपविले आहे. माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना आचार समिती तर माजी मंत्री संजय झा यांना याचिका समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. याबाबत परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अवधेश नारायणसिंह यांनी आदेश पारित केले.