Nitish Kumar's EXIT POLL, know who will get how many seats | बिहारमध्ये सत्ताबदलाची चिन्हे : नितीशकुमार- भाजपाला झटका तर राजद-काँग्रेसला जनतेचा कौल.. जाणून घ्या बिहारचे Exit Poll | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटNovember, 07 2020

बिहारमध्ये सत्ताबदलाची चिन्हे : नितीशकुमार- भाजपाला झटका तर राजद-काँग्रेसला जनतेचा कौल.. जाणून घ्या बिहारचे Exit Poll

द्वारा- Aparna
डिजिटल कंटेन्ट राइटर
21:33 PMNov 07, 2020

मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांना सर्वाधिक पसंती

इंडिया टीव्ही अॅक्सिस पोलच्या सर्वेनुसार, राजदचे सर्वात प्राध्यान्यक्रम असलेले उमेदवार आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र ३१ वर्षीय तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी सर्वाधिक जनता उत्सुक आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव (राजद) – ४४ टक्के, नितीश कुमार (जदयू) – ३५ टक्के तर चिराग पासवान (लोजपा) – ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

 

19:50 PMNov 07, 2020

टाईम्स नाऊ - सी वोटर

एकूण जागा : २४३

महाआघाडी : १२० जागा

एनडीए : ११६ जागा

इतर : ७ जागा

19:46 PMNov 07, 2020

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात चुरस

सध्या बिहारमध्ये एनडीएप्रणित आघाडीनं नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं आहे, तर महाआघाडीनं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे.

 

19:43 PMNov 07, 2020

टीव्ही ९ -भारतवर्ष एक्झिट पोल

एनडीए : ११० - १२० जागा

महाआघाडी : ११५ - १२५ जागा

एलजेपी : ३ - ५ जागा

इतर : १०- १५ जागा 

 

19:38 PMNov 07, 2020

बिहारचा किंग मेकर कोण होणार ?

बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर  एक्झिट पोल्स जाहीर केले जात आहेत. त्यातून मग राज्यात कुणाची सत्ता येऊ शकेल, याचा अंदाज एक्झिट पोल्स जाहीर करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था मांडत आहेत. हे सर्व पोल इतर विविध संस्थांनी घेतले आहेत.

 

19:33 PMNov 07, 2020

टीव्ही ९ एक्झिट पोल


एनडीए : ११० - १२० जागा
महाआघाडी : ११५ - १२५ जागा
एलजेपी : ३ - ५ जागा
इतर : १०- १५ जागा

19:16 PMNov 07, 2020

रिपब्लिक-जन की बात

जदयु, भाजपा आघाडी- ९१ -११७

राजद, काँग्रेस आघाडी- ११८-१३८

लोजपा- ५-८

इतर- ३-६

19:15 PMNov 07, 2020

एबीपी आणि सी व्होटर-

 

जदयु, भाजपा आघाडी- १०४-१२८

राजद, काँग्रेस आघाडी- १०८-१३१

लोजपा- १-३

इतर- ४-८

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी निवडणुक झाली आहे. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला आहे बिहारचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलची प्रतीक्षा राजकीय पक्षांबरोबरच सर्वसामान्यांनाही आहे. कोरोना काळात बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीवर देशभरातील नागरिकांची नजर टिकून राहिली आहे.

बिहारच्या २४३ जागांच्या एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. नितीशकुमार यांना ३७.७ टक्के मते मिळाली आहेत. लालूंच्या पक्षाला ३६ टक्के मते मिळाली आहेत. जागांची चर्चा केल्यास नितीशकुमार यांच्या युतीला १०४ ते १२८ तर लालू आघाडीला १०८ ते १३१ जागा मिळू शकतात, चिराग पासवान यांना १ ते ३ आणि इतरांना ४ ते ८ जागा मिळतील.

 

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२७ मंगळवार
मंगळवार, जुलै २७, २०२१

एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.