Tejaswi Yadav's move to form a grand coalition government; MLAs ordered not to go outside Patna for a month

बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असताना तेजस्वी(tejashwi yadav) यादव यांनी महागठबंधन(mahagathbandhan bihar) सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी आपल्या पक्षाचा सर्व आमदारांना एक महिना पाटण्याबाहेर न जाण्याचे आदेश दिले आहेत.

पाटणा : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असताना तेजस्वी(tejashwi yadav) यादव यांनी महागठबंधन(mahagathbandhan bihar) सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी आपल्या पक्षाचा सर्व आमदारांना एक महिना पाटण्याबाहेर न जाण्याचे आदेश दिले आहेत.

निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी नवनियुक्त आमदारांसोबत मंथन बैठक घेतली.  या बैठकीतच तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तेजस्वी यादव यांनी यावेळी आरजेडीच्या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात न परतता पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याचा आदेश दिले आहेत. विकासशील इन्सान पार्टी आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचा एनडीएमध्ये कशा पद्धतीने समावेश होते हे पाहून पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावरही टीका केली. तुमच्याकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर कट रचणं सोडून द्या असा टोला त्यांनी लगावला. “त्यांनी लोकांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि आपल्या पदावरुन मागे हटलं पाहिजे. याआधी त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याबद्दल सांगितलं होतं. राजकारणातील आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी असं काही अनादर वाटणारं काम करु नये,” असा सल्ला तेजस्वी यादव यांनी दिला.

जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने होता, पण निवडणूक आयोगाचा निर्णय एनडीएच्या बाजूने होता. यापूर्वी देखील २०१५ मध्येही जेव्हा महागठबंधन झालं होतं तेव्हाही निकाल आमच्या बाजूने होता, पण भाजपाने मागच्या दरवाजाने प्रवेश केला” अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.

नितीश कुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बिहारमध्ये एनडीएच सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु असताना तेजस्वी यादव आता सत्तास्थापनेसाठी कोणती रणनिती आखताता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.