उद्या ठरणार बिहारचा ‘किंग’; ‘सायलेंट’ मतदार नितिशांना तारणार?

तेजस्वी यादव यांना त्यांचे वडील आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळाला आहे. तेजस्वी यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच वडिलांकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि विजयाचा आशीर्वाद त्यांच्यासाठी खास ठरला आहे.

  • रालोआला चमत्काराची अपेक्षा

bihar election result 
पाटणा.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल  (bihar election result) रविवारी जाहीर होणार आहे. सत्ताविरोधी लाट, तेजस्वी यादवांचा जोरदार प्रचार, नितीशकुमार यांना मानणारा वर्ग, भाजपाची राजकीय खेळी, अशा सर्व पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत निकालपूर्व जनमत चाचण्यांमधून महाआघाडीला स्पष्ट विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अजूनही रालोआला सायलेंट मतदारांकडून चमत्काराची अपेक्षा आहे.

याचबरोबर, महिला मतदारांबाबतही रालोआत उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये राज्यातील महिला मतदारांची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त होती आणि याचा थेट फायदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मिळाला होता.

सहजरित्या सरकार बनवू : भाजप
जनमत चाचण्यांचे अंदाज रालोआच्या बाजूने नसले तरी, जदयु आणि भाजपला सायंलेंट आणि महिला मतदारांमुळे आशेचा किरण दिसून येत आहे. रालोआमध्ये सध्या शांतता असली तरी जदयु आणि भाजपा नेत्यांचे सायलेंट मतदार विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवू शकतात, असे म्हणणे आहे.

बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसावल यांच्या मते, बिहारमध्ये बरेच मतदार असे आहे, ज्यांना पंतप्रधान मोदी यांच्या योजनांमुळे थेट लाभ झाला आहे आणि हे सायलेंट मतदार आहेत. जनमत चाचण्यांमध्ये अशा मतदारांचे कौल जाणून घेणे कठीण असते. अंतिम निकालाची प्रतीक्षा करा, आम्ही सहजरित्या सरकार बनवू, असा दावाही त्यांनी केला आहे.

जदयुला मुख्यमंत्र्यांवर विश्वास
दुसरीकडे, जदयू नेते महिला आणि ईबीसी मतदारांमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेमुळे आस्वस्त दिसून येत आहे. बिहार जदयुचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चौधरी यांनी एक्झिट पोलवर नव्हे तर मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचे म्हटले आहे.

२००५ मध्ये कोणत्याही एग्झिट पोलमध्ये नितीशकुमारांचे पुनरागमन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला नव्हता. २०१० मध्ये त्रिशंकू विधानसभेची भविष्यवाणी करण्यात आली होती, तर २०१५ मध्ये एग्झिट पोलने भाजप सरकारचे भविष्य वर्तविले होते. यामुळे आम्ही एग्झिट पोलवर विश्वास करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महिला मतदार करतील मोठी उलथापालथ
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी सर्वाधिक ६०.५% मतदान केले होते आणि ५३.३ टक्के पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याचा थेट लाभ नितीशकुमार यांना मिळाला आणि त्यांचे सत्तेत पुनरागमन झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५४.९% पुरुषांनी मतदान केले होते, तर महिला मतदारांची टक्केवारी ५९.६ होती. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४० जागांपैकी रालोआने ३९ जागा जिंकल्या होत्या. यामुळे २०२० मध्येही महिला मतदारांमुळे मोठी उलथापालथ होऊ शकते. महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी जास्त अल्यामुळे सत्ताधाऱ्यांना थोडे बळ मिळाले आहे.

३ एग्झिट पोल ठरले होते चुकीचे

एग्झिट पोलबाबत बोलायचे झाल्यास, २००५, २०१० आणि २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत ते खोटे ठरले होते. २००५ मध्ये नितीशकुमार यांचे सत्तेत पुनरागमन होईल, असे कोणालाही वाटत नव्हते. याचबरोबर, २०१० विधानसभा निवडणुकीतही जनमत चाचण्यांची भविष्यवाणी सत्यात उतरली नव्हती. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे सरकार येईल, असा अंदाज बऱ्याच एग्झिट पोलमधून वर्तविण्यात आला होता, मात्र त्यावेळी महाआघाडीला भरघोस बहुमत मिळाले होते.

त्रिशंकू निकाल छोट्या पक्षांसाठी लाभदायी
विधानसभा निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यास राज्यातील राजकीय समीकरणे कशी असतील, याबाबत राजकीय विश्लेषकांनी भाष्य केले आहे. रालोआ आणि महाआघाडी यापैकी एकाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राजकीय आघाड्यांची फेर मांडणी होऊ शकते. यामध्ये चिराग पासावान यांची लोकजनशक्ती पार्टी आणि अन्य छोट्या पक्षांसह अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागल्यास चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, जितनराम मांझी यांचा हम तसेच उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोकसमाज पक्ष, मुकेश साहानी यांचा व्हीआयपी त्याबरोबरच जनअधिकार पार्टी या किरकोळ जागा जिंकरणाऱ्या पक्षांची चांदी होऊ शकते.

अशी असतील समीकरणे
– विविध जमनत चाचण्यांमधून आघाडीवर दिसत असलेल्या तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीसह अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते.

– नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआला बहुमतासाठी आवश्यक जागा न मिळाल्यास आणि महाविकास आघाडीही सत्तेपासून दूर राहिल्यास छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने रालोआ बहुमताचा आकडा गाठू शकते.

– जमनत चाचण्यांमधून काही सर्वेंमधून भाजपाला जदयुपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात असा निकाल लागून रालोआला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत चिराग पासवान यांनी पाठिंब्याच्या बदल्यात भाजपाच्या मुख्यमंत्र्यासाठी आग्रह धरल्यास नितीशकुमार यांच्याऐवजी भाजपाचा नेता मुख्यमंत्री बनू शकतो.

– भाजपाला जदयुपेक्षा अधिक जागा मिळाल्यास आणि भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरल्यास अशा परिस्थितीत नितीशकुमार पुन्हा एकदा महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकतात. मात्र अशा परिस्थितीत नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे नसतील. मात्र अशी आघाडी आकारास येण्याची शक्यता सध्यातरी कमी आहे.

तेजस्वींना जनतेकडून मिळणार मुख्यमंत्रिपदाचे ‘गिफ्ट’?

बिहारसह संपूर्ण देशाचे लक्ष आता मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. जनमत चाचण्यांचा कौल पाहता तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला लाभ होणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे महाआघाडीची धुरा सांभाळणारे राजदचे नेते तेजस्वी यादव यांचा सोमवारी जन्मदिनही होता. जर जनमत चाचण्यांचे कौल खरे ठरले तर तेजस्वी यांचे मुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित मानले जात आहे. असे झाले तर बिहारच्या जनतेकडून त्यांच्यासाठी हे सर्वात मोठे 'राजकीय गिफ्ट' ठरेल. परंतु, सर्व स्थिती मंगळवारीच स्पष्ट होईल.

लालूंचा तेजस्वींना आशीर्वाद
तेजस्वी यादव यांना त्यांचे वडील आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळाला आहे. तेजस्वी यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच वडिलांकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि विजयाचा आशीर्वाद त्यांच्यासाठी खास ठरला आहे.