giriraj singh

अत्यंत अटतटीच्या झालेल्या लढतीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएला २४३ जागांपैकी १४३ तर महाआघाडीला ११० जागा प्राप्त झाल्या. या निवडणुकीत एनडीएने बहुमत भलेही प्राप्त केले असले तरी महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राजदला मात्र सर्वाधिक ७५ जागा प्राप्त झाल्या असून तोच सर्वात मोठा पक्ष म्हणूनही उदयास आला आहे.

  • बिहार निवडणूक

पाटणा. बिहार विधानसभेत भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआला १२५ जागांसह बहुमत प्राप्त झाले आहे. या निवडणुकांच्या निकालांसह राज्यात भाजपा मोठा पक्ष म्हणूनही उदयास आला आहे. या विजयामुळे भाजपाच्या गोटात उत्साह असून निकालानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी वेळ आल्यावर आज नाही तर उद्या भाजपाचाही मुख्यमंत्री होईल असे मत व्यक्त केले आहे.

लोकशाहीत ५१-४९ चा खेळ नेहमीच होतो. या निवडणुकीत आम्ही बहुमताची आकडेवारी गाठली आहे. काहीजण या निवडणुकीवेळी आमच्यावर विविध स्वरुपांचे आरोप करीत होते. परंतु आरोप करणारेच या निवडणुकीत सपेशल अपयशी ठरले. लोकशाहीत बहुमतावरच सर्व खेळ चालतो. ज्याच्याकडे बहुमत असते तोच सरकारची स्थापना करतो. भाजपोन गुजरातमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व आठही जागांवर विजय मिळविला आहे.

गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री

नितीशच मुख्यमंत्री : सुशील मोदी

बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्रिपदावरूनही चर्चा सुरू झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून अन्य कोणालाही नितीशकुमार यांची जागा घेण्याचा प्रश्नच नाही असे मत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील मोदी यांनी व्यक्त केले. नितीशच मुख्यमंत्री राहणार असून तसे आम्ही वचनबद्धही आहोत. निवडणुकीत कोणाला अधिक तर कोणाला कमी जागा मिळतात परंतु आम्ही समसमान भागीदार आहोत असे मोदी म्हणाले.

एनडीएला बहुमत, राजद सर्वात मोठा पक्ष
अत्यंत अटतटीच्या झालेल्या लढतीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएला २४३ जागांपैकी १४३ तर महाआघाडीला ११० जागा प्राप्त झाल्या. या निवडणुकीत एनडीएने बहुमत भलेही प्राप्त केले असले तरी महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राजदला मात्र सर्वाधिक ७५ जागा प्राप्त झाल्या असून तोच सर्वात मोठा पक्ष म्हणूनही उदयास आला आहे. या निवडणुकीत जदयू आणि काँग्रेसला मोठे नुकसानही सोसावे लागले.