बिहार जनतेचा कौल कुणाला? निवडणुकांचे निकाल आणि विश्लेषण पाहा फक्त ‘नवराष्ट्र वेबपेज’वर उद्या सकाळी ८ वाजल्यापासून..

२४३ जागांसाठी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १० नोव्हेंबरला सकाळी ८ वाजेपासून 'नवराष्ट्र वेब'पेज... कोणता पक्ष आघाडीवर आहे आणि सत्तेच्या शर्यतीत कोण मागे आहे तसेच निवडणुकीचे अचूक विश्लेषण बघता येईल .

२४३ जागांसाठी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १० नोव्हेंबरला सकाळी ८ वाजेपासून ‘नवराष्ट्र वेब‘पेजवर…

मराठी वेबसाइट : https://www.navarashtra.com/
हिंदी वेबसाइट : https://www.navabharat.com/

या पेजवर कोणता पक्ष आघाडीवर आहे आणि सत्तेच्या शर्यतीत कोण मागे आहे, तसेच निवडणुकीचे अचूक विश्लेषण बघता येईल …

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election) घेण्यात आलेल्या मतदानाची उद्या १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी (Bihar election counting) होणार असून निकाल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयांचा दावा करत आहेत. मात्र, सत्ता नेमकी कुणाची येणार आणि मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे हे निकालानंतरच स्पष्ट होईल. जेडीयू आणि भाजपसमोर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं आव्हान आहे. या निवडणुकीत राज्यात सत्तांतर होईल, असे अंदाज जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आले आहेत. मात्र अनेकदा एक्झिट पोल्सचे अंदाज चुकल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे यावेळी बिहारचा किंगमेकर नक्की कोण याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

-दिग्गजांसाठी लढाई महत्वाची

नितीश कुमार : सध्या बिहारमध्ये एनडीएप्रणित आघाडीनं नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं. नितीश कुमार यांनी प्रचारसभांमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या काळातील ‘जंगलराज’वर वारंवार टीका केली आहे आणि जनतेनं परत एकदा सत्ता द्यावी,असं आवाहन केलं. दरम्यान नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं प्रचारसभेत सांगून भावनिक आव्हान उभे केले.

तेजस्वी यादव : अनुभवी नितीश कुमार यांच्याविरुद्ध नवोदित तेजस्वी यादव अशी ही बिहारची लढाई आहे. नितीश कुमारांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळू शकतो,तर महाआघाडीनं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. तेजस्वी यादव यांनी ही निवडणूक रोजगाराच्या मुद्द्यावर लढली जात असल्याचं म्हटलं आहे.तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी गर्दीही या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरली आहे.

चिराग पासवान : लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान नितीश कुमार यांच्या विरोधात उभे ठाकल्याने आणि जनता दलाविरोधात उमेदवार उभे केल्याने बिहारच्या निवडणुकीत रंजकता निर्माण झाली आहे.लोकजनशक्ती पक्षामुळे नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी ही सरळ लढत ठरली नाही पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात प्रचार केला नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यामंत्रीपदासाठी जाहीर केल्यावर एनडीएप्रणित आघाडीतुन चिराग पासवान बाहेर पडले मात्र पण याचवेळी भाजपला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकालानंतर भाजपबरोबर आघाडी करायची पासवान यांची तयारी आहे. त्यामुळे लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवारांमुळे जनता दलाचं नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी : बिहार विधानसभेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वातील एनडीएसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिहारमध्ये तब्बल १२ प्रचारसभा घेतल्या.बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी, केंद्रीय निवडणूक समिती व संसदीय मंडळातील फेरबदलांचे वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. आगामी पश्‍चिम बंगाल निवडणुका लक्षात घेऊन व बिहारचा कल पाहून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासाठी बिहार निवडणूक ही लिटमस टेस्ट मानली जाते. सध्याची परिस्थिती पाहता भाजपाने यावेळी जास्तीत जास्त युवा चेहऱ्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यांतून बाहेर आणून राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्याचे ठरविल्याचे सांगितले जात आहे.

राहुल गांधी : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही सक्रीय झालेले दिसले. काँग्रेसने राहुल गांधी यांना आपले स्टार प्रचारक जाहीर केले. राहुल यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.नितीश आणि मोदी यांनी एकत्र बिहारची लूट सुरू केली आहे. बिहारमधील शेतकरी, कामगार, छोट्या दुकानदारांना संपवलं आहे. यामुळे बिहारच्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आता महाआघाडीला विजयी करून बिहारमध्ये सत्ता बदलाचं काम करावं आहे, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं होत.