भारतात रॉयल एनफील्डच्या ४ बाईक्स होणार लाँच

Royal Enfield भारतात आपल्या बाईक्सची रेंज वाढवण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफील्ड बाईक्स भारतात खूप प्रसिद्ध आहेत. नवीन बाईक्सची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. कंपनी 350cc सिंगल सिलिंडर इंजिन सोबत ३ नवीन बाईक भारतात लाँच करणार आहे.

नवी दिल्लीः भारतात या वर्षीच्या अखेरपर्यंत रॉयल एनफीडल्डच्या चार बाईक्स लॉंच होणार आहेत. Royal Enfield भारतात आपल्या बाईक्सची रेंज वाढवण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफील्ड बाईक्स भारतात खूप प्रसिद्ध आहेत. नवीन बाईक्सची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. कंपनी 350cc सिंगल सिलिंडर इंजिन सोबत ३ नवीन बाईक भारतात लाँच करणार आहे. सध्या क्लासिक आणि थंडरबर्ड रेंजला रिप्लेस करणार आहे. कंपनी नवीन क्लासिक ३५० लाँच करणार आहे.

350cc शिवाय कंपनी 650cc इंजिन सोबत एक बाईक आणण्याची तयारी करीत आहे. ही बाईक 650cc इंजिन च्या पॉवरफुल ट्विन सिलिंडर इंजिन सोबत येणार आहे. कंपनीच्या नवीन 650cc बाईकला टेस्टिंग दरम्यान पाहिले गेले आहे. ही बाईक Royal Enfield 650 Twins शी मिळती जुळती असू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन मोटरसायकल पूर्णपणे वेगळ्या फ्रेममध्ये येवू शकते. साईडला दिलेल्या मेटल ट्यूबिंग 650 Twins वेगळी दिसत आहे. तसेच रियर शॉक्स सुद्धा वेगळ्या पद्धतीने प्लेस केले आहेत. चाहत्यांना या बाईकची फार उत्सूकता आहे. याआधी भारतात Continental GT 650 आणि Interceptor 650 बाईक्स लाँच करण्यात आल्या आहेत.