harleydavidson shuts down india operations 70 employees face the axe Bawal Plant close
बाइकप्रेमींसाठी वाईट बातमी, हारले डेव्हिडसनने घेतला हा निर्णय

Eicher आपल्या रॉयल इनफील्ड ब्रँड अंतर्गत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक बाईक लाँच करणार आहे.

  • 7.5 कोटी डॉलर्सची रिस्ट्रक्चरिंग कॉस्ट, 70 कर्मचाऱ्यांची कपात
  • बावल प्लांट बंद करणे या बाबींचा समावेश

नवी दिल्ली: अमेरिकन क्रुझर बाइक तयार करणारी कंपनी हार्ले डेव्हिडसन (Harley Davidson) ने भारतीय बाजारातून एक्झिट (Exit from Indian Markets) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 70 कामगारांवर (70 workers) बेरोजगारीची ( jobless) कुऱ्हाड कोसळणार आहे. कंपनी आपल्या ऑपरेटिंग मॉडेलमध्ये मोठे बदल करणार आहे. Harley Davidson भारतातील आपला प्लांट बंद करणार आहे. Harley Davidson बाहेर पडल्याने Eicher ला फायदा होणार आहे.

जाणकारांच्या मते, हार्लेने भारतातून एक्झिट घेतल्याने Eicher ला फायदा होणार आहे. याचा परिणाम आज आइशरच्या शेअरवरही होताना दिसत आहे. आइशर मोटर्सच्या शेअर्समध्ये 2..85 टक्क्यांची वाढ होऊन 2092.15 ते या स्तरावर स्थिरावले आहेत.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आणि उत्पादन त्याच देशात होत नसेल तर त्या उत्पादनाची देखभाल, दुरुस्ती आणि स्पेअर पार्ट्स मिळण्यात अडचणी येतात त्यामुळे लोक हार्ले डेव्हिडसन खरेदी करणार नाहीत. अशातच Eicher आपल्या रॉयल इनफील्ड ब्रँड अंतर्गत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक बाइक लाँच करणार आहे. अशातच हार्लेने भारतातून एक्झिट घेतल्याने फायदा Eicher ला होणार आहे.

हार्ले डेव्हिडसनने गुरुवारी भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करणार असल्याची घोषणा केली. कंपनीने हा निर्णय आपल्या पुर्नबांधणी योजनेअंतर्गत घेतला आहे, याचे नाव द रिवायर आहे. ऑगस्टमध्ये या क्रुझर बाइक निर्माता कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातील होणारे नुकसान लक्षात घेता हे संकेत दिले होते. आता ही कंपनी विशेषत: अमेरिकन बाजारावर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.

Harley Davidson भारतात गेल्या १० वर्षांपासून आपला व्यवसाय करत असली तरीही भारतीय बाजारात तिला आपली पकड मजबूत करता आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून हार्लेने भारतात आपल्या डिलरशिप्सच्या खर्चात कपात करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले. हार्ले डेव्हिडसनच्या या निर्णयात 7.5 कोटी डॉलर्सची रिस्ट्रक्चरिंग कॉस्ट, 70 कर्मचाऱ्यांची कपात आणि बावल प्लांट बंद करणे या गोष्टींचा समावेश आहे. कंपनीने भारतात गुरुग्राम येथे फक्त सेल्स ऑफिस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात Harley च्या बाइक विक्रीत सातत्याने घट होत होती. आर्थिक वर्ष 2019 मध्ये हार्ले बाइक्सची विक्री भारतीय बाजारात 22 टक्क्यांनी कमी झाली. कंपनीने या वर्षी फक्त 2,676 बाइक्सची विक्री केली. पहिल्या आर्थिक वर्षात 3,413 बाइक्सची विक्री झाली. भारतात विक्री होणाऱ्या 65 टक्के बाइक्स या 750CC हून कमी आहेत.

भारतातून एक्झिट घेण्याच्या या निर्णयासोबतच हार्ले डेव्हिडसनचा अशा ब्रँड्समध्ये सामावेश झाला आहे, ज्यांनी गेल्या 3-4 वर्षात भारतीय बाजारातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत जनरल मोटर्स, फियाट, सेसंगयोंग, स्कॅनिया, मॅन आणि युएम मोटरसायकल्सचा समावेश आहे.