होंडाची शानदार H’Ness CB 350 बाईक भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत?

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतात नवी बाईक एच नेस-सीबी 350 (H’Ness CB 350) लाँच (Honda launches)  केली आहे. या बाईकच्या DLX व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत १.८५ लाख रुपये इतकी आहे. एचएमएसआय या शानदार मोटारसायकलच्या बुकींगला (Booking start)  सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने नवी बाईक एच नेस-सीबी 350 (H’Ness CB 350) लाँच (Honda launches)  केली आहे. या बाईकच्या DLX व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत १.८५ लाख रुपये इतकी आहे. एचएमएसआय या शानदार मोटारसायकलच्या बुकींगला (Booking start)  सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना ही बाईक खरेदी करायची आहे, ते पाच हजार रुपये टोकन भरुन बाईकचं प्रिबुकींग (Pre-Booking ) करु शकतात. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

जाणून घ्या फिचर्स

एच नेस-सीबी ३५० या बाईकमध्ये एक ३५० सीसीचं पॉवरफुल ४ स्ट्रोक एअरकुल्ड, ओएचसी सिंगल-सिलेंडर आहे. त्यामध्ये पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये पुढे आणि मागे अधिक व्हिजिबिलिटीसाठी एलईडी सेटअप आहे. सोबतच बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि १५ लीटरचा फ्युल टॅन्क देखील आहे.

होंडाच्या सीबी ब्रॅण्डचा एक मोठा इतिहास आहे. १९५२ मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली होती. सीबी ९२ ही या सिरीजमधली पहिली बाईक होती. एच नेस-सीबी ३५० ही बाईक हा इतिहास पुढे नेणार आहे. होंडा H’Ness CB 350 ची क्लासिक सेगमेंटमधील बाईक्ससोबत स्पर्धा होणार आहे.