TVS Apache RR 310 बाईक आणखी महाग

TVS Apache RR 310 बाईकचे BS6 मॉडेल या वर्षी जानेवारीमध्ये लाँच झाले होते. बीएस६ मॉडेल आल्यानंतर पहिल्यांदा या बाईकच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही बाइक अनेक रायडिंग मोडसह उपलब्ध आहे.

मुंबई : TVS च्या मुख्य बाईकपैकी  TVS Apache RR 310 च्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे. कंपनीने या बाईकच्या किंमतीत ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. किंमतीत वाढ झाल्यानंतर 2020 TVS Apache RR 310 BS6 ची किंमत आता २.४५ लाख रुपये झाली आहे. जानेवारीमध्ये Apache RR 310 चे बीएस६ मॉडेल लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच या बाईकच्या किंमतीत वाढ झाली आहे.

टीव्हीएसच्या या स्पोर्ट्स बाईकमध्ये 312.2cc चे इंजिन असूम ते 34hp ऊर्जा आणि 27.3Nm टॉर्क निर्माण करते. इंजिन स्लिपर क्लच सोबतच ६ स्पीड गिअरबॉक्सने सज्ज आहे. या आकर्षक बाईकमध्ये ४ रायडिंग मोड आहेत, ज्यात स्पोर्ट ट्रॅक, अर्बन आणि रेन यांचा समावेश आहे. सर्व मोडमध्ये पावर आउटपुट, एबीएस इन्टर्वीन आणि टॉप स्पीड वेगवेगळा आहे.

फीचर्स

Apache RR 310 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी सोबतच नवीन ५ इंच कलर TFT इंस्ट्रूमेंट पॅनल देण्यात आले आहे. TVS कनेक्ट अॅपच्या माध्यमातून युजर आपल्या स्मार्टफोनला या डिस्प्लेसोबत कनेक्ट करून अनेक फंक्शन ऑपरेट करू शकतो. या स्क्रीनमध्ये इनकमिंग कॉलरची माहिती, टर्न-बाय-टर्न नेविगेशन, व्हेइकल हेल्थ अलर्ट आणि मोबाइल फोन स्टेटस यासारखी माहितीही दिसते.

TVS च्या या स्पोर्ट्स बाइक मध्ये ड्युल-प्रोजेक्टर LED हेडलॅम्प आणि LED टेललॅम्प दिले आहेत. याच्या पुढच्या बाजूस 300mm आणि मागील बाजूस 240mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत, तर बीएस४ मॉडेलमध्ये मिशलिन पायलट स्ट्रिट्स टायर दिले होते.

KTM RC 390 ला देणार टक्कर

भारतीय बाजारात TVS Apache RR 310 थेट स्पर्धा KTM RC 390 सोबत असणार आहे. किंमतीत वाढ झाली तरी ही बाईक RC 390 च्या तुलनेत ८ हजार रुपयांनी स्वस्त आहे. KTM RC390 ची किंमत २.५३ लाख रुपये आहे.