झळाळते क्रीडा व्यवस्थापन

कतार देशात नुकत्याच संपलेल्या जागतिक फुटबॉल स्पर्धेने सर्व जगाला खिळवून ठेवले होते. यासाठी मैदानातील खेळाडूंचा पराक्रम तर कारणीभूत होताच. पण त्याशिवाय या स्पर्धेचे भव्य आयोजन, क्रीडापटूंची मैदानबाह्य सर्वप्रकारची काळजी आणि देखभाल, त्यांच्या जाहिराती, माध्यमांसमोरचे त्यांचे सादरीकरण, क्रीडा रसिकांसाठी विविध सुविधाची सुलभतेने होणारी उपलब्धी अशा मैदानाबाहेरच्या घडामोडींचा समावेश आहे. या सर्वबाबी क्रीडा व्यवस्थापनात समाविष्ठ होतात. हे अतिशय झपाट्याने विकसित झालेले क्षेत्र असून त्याशिवाय आता जगातील कोणती क्रीडा स्पर्धा यशस्वी होउु शकत नसल्याचे दिसून येते.

    क्रीडा क्षेत्रास आता मोठ्या उद्योगाचे स्वरुप आले आहे. सध्या केवळ मैदानावर उत्तम कामगिरी करुन चालत नाही तर उत्कृष्ट मार्केटिंग करणेही गरजेचे झाले आहे. त्यामुळेच आता विविध क्रीडा स्पर्धा या इव्हेंट्सच्या स्वरुपात खेळवल्या जातात.

    क्रीडाव्यवस्थापनाने या क्षेत्राला नवी झळाळी मिळवून दिली आहे. आपल्यादेशात आणि जगात यापुढे या क्षेत्राच्या बाह्यबाबींच्या समन्वय आणि व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासणार आहे. ही गरज भासवणारे काही अभ्यासक्रम सुरु झाले आहेत.

    (१) इंटरनॅशनल इन्सि्ट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट

    (या संस्थेला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारने भारत सरकारमार्फत सन्मानित करण्यात आले आहे.)

    या संस्थेचे अभ्यासक्रम –

    (१) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट इन स्पोर्ट्स – अभ्यासक्रमाचा कालावधी- ३ वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे.

    (२) मास्टर ऑफ मॅनेजमेंट इन स्पोर्ट्स –

    अभ्यासक्रमाचा कालावधी- २ वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण. हा अभ्यासक्रम एमबीए (मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) च्या समकक्ष आहे. यामध्ये ६० टक्के सर्वसाधारण व्यवस्थापनाची तत्वे आणि ४० टक्के क्रीडा व्यवस्थापनाची तत्वे शिकवली जातात. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे.

    (३) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन स्पोर्ट्स-

    या अभ्यासक्रमामध्ये क्रीडाक्षेत्राशी निगडित लेखा आणि वित्त, क्रीडा विपणन (मार्केटिंग) यावर भर दिला जातो. शिवाय शारीरिक क्षमतेविषयी जाणीवजागृती, जीवनशैली व्यवस्थापनात पोषणआहार आणि योगाचे महत्त्व, निरोगी आरोग्य क्षेत्रातील व्यवसाय, आदी विषयघटकांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात येतो. कालावधी- ११ महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण.
    संपर्क- इंटरनॅशनल इन्सि्ट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (आयआयएसएम) तिसरा माळा, विस्तारित इमारत, जयहिंद कॉलेज, ए रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०, संकेतस्थळ-
    http://www.iismworld.com/, ईमेल- admissions@iismworld.com, संपर्कध्वनी-८९७६०१८८७२

    (२) नॅशनल ॲकेडमी ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट-

    या संस्थेचे अभ्यासक्रम (१) बीबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी, कालावधी-३ वर्षे. (२) एमबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी, कालावधी-२ वर्षे. (३) पोस्ट गॅज्यूएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी, कालावधी-१ वर्षे. (३) डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी, कालावधी-१ वर्षे.

    संपर्क- नॅशनल अकॅडेमी ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट कॅम्पस, नगिनदास खंडवाला कॉलेज, एस.व्ही.रोड, मलाड(पश्चिम), मुंबई-४०००६४, टेलिफॅक्स- ०२२-२८४४४१११, संकेतस्थळ- http://www.nasm.edu.in/, ईमेल- mumbai@nasm.edu.in / info@nasm.edu.in/

    (३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर ॲण्ड बिझिनेस मॅनेजमेंट (आयआयएडब्ल्यूबीए)

    संस्थेचा अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट. कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- आयआयएडब्ल्यूबीए मॅनेजमेंट हाऊस, कॉलेज स्क्वेअर (वेस्ट), कोलकाता- ७०००७३, दूरध्वनी-०३३-४०२३७४७४, फॅक्स- २२४१३९७८, संकेतस्थळ- www. iiswbm.edu ईमेल-sports@iiswbm.edu

    (४) एमआयटी पुणे

    या संस्थेने एमबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- दोन वर्षे/ अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमात क्रीडा क्षेत्राशी संबंधित नियोजन, आयोजन, नियंत्रण, ग्राहकसेवा, आतिथ्य, विक्री आणि विपणन, दिशा निर्देशन, वाटाघाटी, ग्राहक संबंध व्यवस्थापन, विश्लेषण, माहितीचे संकलन आदी बाबींचा समावेश करण्यात येतो.
    संपर्क- एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, रस्ता क्रमांक १२४, पौड रोड, कोथरुड,पुणे-४११०३८, दूरध्वनी- ०२०-७११७७१०४, टेलिफॅक्स- ७११७७१०५, संकेतस्थळ- http://mitwpu.edu.in/mba-sports-management/, ईमेल- admissions@mitwpu.edu.in

    स्पोर्ट्स कम्युनिकेशन

    मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेने स्पोर्ट्स कम्युनिकेशन या विषयातील दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. (१) पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स कम्युनिकेशन/ कालावधी – एक वर्षं / अर्हता – कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. (२) सर्टिफिकेट कोर्स इन स्पोर्ट्स कम्युनिकेशन/कालावधी – दोन महिने / अर्हता – कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम केल्यावर क्रीडा माध्यमे, क्रीडा इव्हेंटस् व्यवस्थापन, क्रीडा नियतकालिकांसाठी लेखन आदी करीअर संधी मिळू शकतात. संपर्क- डायरेक्टर, मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन,मनिपाल- ५७६१०४, संकेतस्थळ – www.manipal.edu, ईमेल- admissions@manipal.edu

    क्रीडा प्रशिक्षण

    स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने क्रीडा प्रशिक्षण या विषयातील सहा आठवडे कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम संस्थेच्या पतियाळा, बेंगळुरु, थिरुवनंतपूरम, कोलकता, गांधीनगर या कॅम्पसमध्ये करता येतो. शिवाय सोनपत, रोहतक, लखनौ विद्यापीठ, एसआरएम युनिव्हर्सिटी-कांचीपूरम, स्वर्णिम गुजरात युनिव्हर्सिटी गांधीनगर कॅम्पस, केआयआयटी युनिव्हर्सिटी-भूवनेश्वर, ए.एन युनिव्हर्सिटी-गुंटूर, बनारस हिंदू विद्यापीठ-वाराणसी, सिंघानीया विद्यापीठ-राजस्थान या ठिकाणी हे प्रशिक्षण घेता येते. क्रीडा प्रशिक्षणाशी संबंधित शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे,औद्योगिक घराणी आणि इतर अशाच प्रकारच्या संस्थांमधील व्यक्ती या अभ्यासक्रमला प्रवेश घेऊ शकतात. हे प्रशिक्षण दरवर्षी उन्हाळा आणि हिवाळ्यात आयोजित केले जाते.

    संपर्क- स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ,नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिस्ट्यूट ऑफ स्पोर्ट्स ,ओल्ड मोती बाग, पतियाळा- १४७००१, दूरध्वनी- ०१७५-२३०६१७१, फॅक्स-२२१२०७०, संकेतस्थळ-http://nsnis.org, ईमेल-mail@nsnis.org

    सुरेश वांदिले

    ekank@hotmail.com