career-in-tv

दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या दोन्ही कला कष्टसाध्य आहेत. तुम्ही प्रतिभावंत असाल तर तुम्हाला ही कला हस्तगत करायला जास्त वेळ लागणार नाही. मात्र आवड, ओढ आणि कल असलेल्या तरुण आणि तरुणी अभ्यासाने या दोन्ही कला साध्य करु शकतात.

    भारतातीलच नव्हे तर जगातील मनोरंजन उद्योगाची अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. या उद्योगामध्ये टीव्ही वाहिन्या, इव्हेंट्स, लाइव्ह कार्यक्रम, जाहिराती, व्हिडिओपट, म्युझिक अल्बम, रिॲलिटी शो, चित्रपट, डाक्युमेंट्री, ॲनिमेशनपट आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिका (उदा. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, सोनी-लिव इत्यादी.) यांचा समावेश करता येईल. या सर्व कार्यक्रमांच्या यशात दिग्दर्शन आणि पटकथा लेखक महत्वाची भूमिका बजावतात.

    दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या दोन्ही कला कष्टसाध्य आहेत. तुम्ही प्रतिभावंत असाल तर तुम्हास ही कला हस्तगत करायला अधिकवेळ लागणार नाही. मात्र आवड, ओढ आणि कल असलेल्या तरुण आणि तरुणी अभ्यासाने या दोन्ही कला साध्य करु शकतात.

    पूर्वी या क्षेत्रात येण्याची इच्छा व आवड असणाऱ्या व्यक्ती विविध चित्रपट बघून आपल्या ज्ञानाची कक्षा वाढण्याचा प्रयत्न करत असत. एका अर्थी ते एकलव्याच्या भूमिकेतून असा अभ्यास करत. अशा एकलव्यांवर त्यांच्या आवडत्या दिग्दर्शकाच्या आणि पटकथालेखकाच्या शैलीचा प्रभाव दिसून येत असे. या अभ्यासातून ते शिकत. हळूहळू स्वत:ची शैलीही विकसित करत.

    तंत्रावर हुकूमत मिळवत. आतासुध्दा याच मार्गाने जाऊ इच्छिणारे अनेक जण आहेत. पण सध्या या दोन्ही कलांचे तंत्र आणि कौशल्य शिकवणारे विविध अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे दोन्ही कलेच्या सैध्दांतिक बाजू समजून घेणे सुलभ होते. या बाजू पक्क्या झल्यावर आणि विविध संकल्पना स्पष्ट झाल्यावर प्रात्यक्षिकांची उत्तम तयारी करता येऊ शकते. या दोन्ही कला शिकलेल्या उमेदवारास कोणत्याही माध्यमामध्ये कार्यरत होणे कठीण जात नाही.

    अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था

    फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया – भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या कार्यरत असणाऱ्या या संस्थेने टीव्ही दिग्दर्शन आणि चित्रपट दिग्दर्शनासाठी पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

    १) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्क्रीन रायटिंग (फिल्म, टीव्ही ॲण्ड वेब सिरीज), कालावधी- दोन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.

    (२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इनडिप्लोमा इन डायरेक्शन ॲण्ड स्क्रीनप्ले रायटिंग (कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कला/ वाणिज्य/ विज्ञान शाखेतील पदवी).

    निवड प्रक्रिया- अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी १०० गुणांची चाळणी परीक्षा (जॉईंट एन्ट्रन्स टेस्ट) घेतली जाते. कालावधी- तीन तास. या परीक्षेत विशिष्ट गुण मिळणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. अंतिम निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि प्रात्यक्षिकांमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते. परीक्षा केंद्रे- मुंबई आणि पुणे.
    संपर्क- फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे- ४११००४, दूरध्वनी-२५५८०००५, टेलिफॅक्स-२५५८००७, फॅक्स- २२५८०१५२ ईमेल-academics.office@ftii.ac.in,
    संकेतस्थळ- http://www.ftiindia.com.

    सत्यजित रे फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट – या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन सिनेमा हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवीधर.

    या अभ्यासक्रमांतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन, छायाचित्रणकला, ध्वनीमुद्रण आणि डिझाइन, संपादन आणि ॲनिमेशन सिनेमा या सहा विषयांपैकी एका विषयात स्पेशलायझेशन करता येते.

    दिग्दर्शन आणि पटकथा लेखन

    या स्पेशलायझेशनमध्ये पुढील विषय घटकांचा अभ्यास करता येतो. पहिल्या सत्रामध्ये दिग्दर्शन, चित्रपटाचे व्याकरण, स्थानिक जोडणी, ऐहिक जोडणी, पटकथेची मूलभूत तत्वे, पटकथेचे‍ विविध प्रकार, कथेची रचना, अभिनयाची रचना, नायकाचा प्रवास, मिथक आणि मूळप्रकार, मूक चित्रपटाचा इतिहास, चित्रपट उद्योगाचा इतिहास, चित्रपट तंत्राची उत्क्रांती, चित्रपटाची भाषा, श्रेष्ठ चित्रपट व्यक्तिमत्वाचे योगदान, चित्रपटातील ध्वनीचे आगमन आणि बोलपटाचा जन्म, डॉक्युमेंट्री चित्रपटांचा इतिहास, डॉक्युमेंट्रीचे विविध प्रकार, समकालीन डॉक्युमेंट्रीची तोंडओळख, जागेचे नियोजन, साधनसामग्री, पोत, भारतीय शास्त्रीय संगीताचे आकलन, सुरांची ओळख, मध्यम आणि पंचम भाव, सुरांची गुणवत्ता, राग आणि रागांच्या भावभावना, रागांचे वर्गिकरण, सहा राग आणि ३६ रागिणी, भावभावना, ऋतू आणि दिवसातील विविध प्रहरांशी निगडित राग, भातखंडे थाट शैली, थाट आणि असरित राग, चित्रपटातील राग संगीत, तालाची मूलभूत तत्वे, विविध घराण्यांची तोंडओळख, विविध प्रकारचे अभिनय, अभिनयाच्या कार्यपध्दती, भूमिका– भौतिक, मानसशास्त्रीय आणि सामाजिक, अभिनयातील स्वयंस्फूर्त सुधारणा, आंतरसंवादीय कार्यशाळा, संकल्पना, कल्पना आणि कथेचे पटकथेत रुपांतरण, एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरु असलेल्या प्रकल्पाला भेट, त्या निरीक्षणाच्या लेखी नोंदी, आदी बाबींचा समावेश या सत्रात केला जातो.

    स्पेशलायझेशन

    दुसऱ्या ते सहाव्या सत्रामध्ये स्पेशलायझेशनचा अभ्यास करता येतो. यामध्ये चित्रपट दिग्दर्शन, चित्रपटातील दृश्याच्या सुसंगतीचे विश्लेषण, आकलन, पटकथा लेखन, संगीत आकलन, कला दिग्दर्शन, दिग्दर्शकाचा अभ्यास, चित्रांकनाची कला, अभिनयाची कार्यशाळा, निर्मिती डिझाइन कार्यशाळा, कार्यप्रणाली कार्यशाळा, चित्रपट निर्मिती, लघू चित्रपट पटकथा विकास, पार्श्वगायन कार्यशाळा आदी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो.

    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक ॲण्ड डिजिटल मीडिया, कालावधी – दोन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, निवड- जॉईंट एन्ट्रन्स टेस्टव्दारे.

    संपर्क- सत्यजित रे फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन, ई. एम. बायपास रोड, पोस्ट ऑफिस पंचासायार, कोलकता- ७०००९४, दूरध्वनी- ०३३-२४३२८३५५, फॅक्स- २४३२०७३२, ईमेल-registrar@srfti.ac.in, संकेतस्थळ-http://srfti.ac.in

    व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन ॲण्ड मीडिया आर्ट्स

    अभ्यासक्रम- डिप्लोमा इन स्क्रीनरायटिंग, कालावधी- एक वर्ष. यामध्ये पटकथा लेखनाच्या मूलभूतबाबी, लघुचित्रपटासाठीची पटकथा, टीव्हीसाठी लेखन, पटकथेचे प्रगत सिध्दांत, आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
    संस्थेने बी.ए इन स्क्रीन प्ले रायटिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण.

    संपर्क- फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५, दूरध्वनी- ०२२-६२७१६०७०, टेलिफॅक्स- ६२७१६१७५, ईमेल- admissions@whistlingwoods.net, संकेतस्थळ-www.whistlingwoods.net.
    गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट

    अभ्यासक्रम – बॅचलर इन मल्टीमीडिया- स्क्रीन रायटिंग. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण. कालावधी- ३ वर्षे
    काय शिकाल?

    इंग्रजीतून संवाद संप्रेषण, कला आणि अभिकल्प (डिझाइन), विचार आणि अभिकल्प प्रक्रिया, छायाचित्र, चित्रपटनिर्मितीची तोंडओळख, मानवीस्वभाव आणि व्यक्तिरेखांचा विकास, कथाकथन, ग्राफिक्स, पाच मिनिटाचा चित्रपट, पटकथेची कॉपी तयार करणे, ब्रँडिंग करणे, काव्य, साहित्य आणि महाकाव्यांचा अभ्यास, जाहिरातींसाठी आणि सार्वजनिक उपयुक्तता असलेल्या चित्रपट/ जाहिरातीसाठी लेखन, भाषा आणि संवाद, दूरचित्रवाहिनींसाठी लेखन, लघुचित्रपटासाठी लेखन, तज्ज्ञांच्या कलाकृतींचा अभ्यास, लघुपट आणि पूर्ण लांबीच्या चित्रटपटांवर आधारित संशोधनकार्य, कथनाची शैली, साहित्यकृतीवर आधारित पटकथा, निर्मिती अभिकल्प (प्रॉडक्शन डिझाइन), ॲनिमेशनपटासाठी लेखन, व्यक्तिरेखांचा विकास, संघर्ष आणि धक्कातंत्रे, कॉपीराइट आणि व्यावसायिक करार या घटकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना एक पूर्ण लांबिच्या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचा प्रकल्प करावा लागतो.

    संपर्क- मुंबई विद्यापीठ विद्यानगरी सांताक्रुझ पूर्व कॅम्पस, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२-२६५३०२५८, फॅक्स- २६५३०२६३
    ईमेल- gicedenquiry@giced.mu.ac.in, संकेतस्थळ-www.giced.co.in

    सुरेश वांदिले

    ekank@hotmail.com