उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

युद्ध जिंकलेल्या उद्धव ठाकरे यांनी पराभूत मानसिकतेतील काँग्रेस आणि डावपेचात तरबेज राष्ट्रवादीबरोबर केलेल्या हातमिळवणीत ऐतिहासिक यश मिळवले. मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसल्यानंतरही झालेल्या खडतर प्रवासात त्यांनी एक वर्ष(one year of mahavikar aghadi)(one year of thakre government) अतिशय चाणाक्षपणे पार पाडले आहे. युद्धात आणि तहातही जिंकलेला यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची गणती झालेली आहे.

भारतीय जनता पक्षाने(bhartiya jantapa party) दगाबाजी केल्यानंतर सावध झालेल्या उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी ‘एकला चलो रे’ चा नारा दिला होता. त्यानंतर सत्तेच्या खेळात राजकीय लपंडाव खेळताना शिवसेनेची पुन्हा एकदा फरफट करण्याच्या अविर्भावात भाजप नेते होते. शिवसेना पुरती हारली आहे ती आपल्याला सोडून कुठेही जावू शकत नाही या भ्रमात ते राहीले. मात्र त्यांचा डाव उधळून राजकीय युद्ध जिंकलेल्या उद्धव ठाकरे यांनी पराभूत मानसिकतेतील काँग्रेस आणि डावपेचात तरबेज राष्ट्रवादीबरोबर केलेल्या हातमिळवणीत ऐतिहासिक यश मिळवले. मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसल्यानंतरही झालेल्या खडतर प्रवासात त्यांनी एक वर्ष(one year of mahavikar aghadi)(one year of thakre government) अतिशय चाणाक्षपणे पार पाडले आहे. युद्धात आणि तहातही जिंकलेला यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची गणती झालेली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आणि त्याची कमान मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. एक उत्तम छायाचित्रकार आणि मनस्वी कलावंत, म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख. अनेक वर्षे राजकारणाच्या आखाड्यापासून दूर राहीलेले त्यांचे व्यक्तिमत्व. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते उत्तराधिकारी होतील, त्यानंतर सक्रिय राजकारणात येतील, शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेचे नेतृत्व करतील, त्या संघटनेला वाढवतील, पुढे संसदीय राजकारणात येतील आणि थेट मुख्यमंत्री होतील असे राजकीय पंडितांनाही कधी वाटले नव्हते. मात्र सगळ्यांचेच अंदाज चुकवत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची एक वर्षाची कारकीर्द यशस्वीपणे पार पाडली आहे.

सुरूवातीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री मिळाली आणि त्यासह सत्ताही लाभली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी २००३ साली त्यांचे वडील तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. १४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. या दरम्यानचा कालखंड कायमच त्यांच्यासाठी परिक्षेचा राहीला आहे.

सुरूवातीला तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी उद्धव ठाकरे यांचे मतभेद वाढत गेले. त्यामुळे अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी मिळालेले शिवसेना नेते नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेना पक्षाचे तत्कालीन कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे आणि शिवसेनेत आपल्याला फारसे भवितव्य नसल्याचे समजल्यामुळे राणे यांनी शिवसेना सोडली आणि नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. राणे यांनी अपमनाचा वचपा काढण्यासाठी २०१५ ला बांद्रे पुर्व येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या काँग्रेसकडून रिंगणात उतरून ठाकरेंच्या मातोश्री या किल्ल्यालाच आव्हान दिले होते, मात्र राणेंचा पराभव करून त्यांचा हल्ला व्याजासह परतवणाऱ्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला बळ दिले. वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा १९ हजार ८ मतांनी पराभव करीत त्यांना धूळ चारली होती.

राणे शिवसेनेबाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठ्या संकटातून जावे लागले होते. त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे फारसे राजकीय गणित जमले नाही. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले होते. आक्रमक चेहरा आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आग ओकणारी ठाकरी शैली अंगीकृत असलेल्या राज ठाकरेंना शिवसैनिक स्विकारणार की शांत संयमी उध्दव ठाकरेंचे नेतृत्व मान्य करणार हा प्रश्नै सर्वांना पडला होता. मात्र याबबतीतलेही सारे अंदार फोल ठरवत उद्धव ठाकरे यांनी कंबर कसून शिवसेना सावरली. वडिलोपार्जित परंपरेने मिळालेली पत, प्रतिष्ठा आणि संपत्ती मोडून खाणारे अनेक नेते राज्यात आणि राष्ट्रीय राजकारणात पहायला मिळतात मात्र उद्धव ठाकरे हे जरा वेगळ्या संस्कारातील असल्याचे त्यांनी सिध्द केले.

त्यांची राजकीय वाटचाल ही सतत परीक्षेला बसणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यासारखी राहिली आहे. विरोधकांकडून आणि अधूनमधून आपल्याच माणसांकडून प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावर होत असतो. यातील काही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी कायमचे निकाली काढले आहेत. आपले खरे कसब त्यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येच दाखवले. भाजपने ऐनवेळी दगाबाजी केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली आणि ५६ आमदार निवडून आणले! पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडी चे सरकार स्थापन केले आणि राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.

त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासूनच त्यांच्या सत्तेवरून पायउतार करण्याचे मुहूर्त भाजपच्या गोटातून पेरले जावू लागले. ते आमदारच होवू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न झाले. खुपच चिखलफेक होवू लागल्यावर त्यांना विधानपरिषदेवर निवडून येण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर एक महिना, तीन महिने मग सहा महिने, असे सरकार पाडण्याचे मुहूर्त घोषित करण्यात आले, मात्र कोरोनाच्या संकटातून राज्य आणि देश जात आहे किमान याचे तरी भान ठेवा, अशा कानपिचक्या मिळाल्यानंतर भाजपची फौज कोरोनाच्या कामाला लागली. मग रूग्णांना मिळत नसलेल्या सेवेबद्दल आरडाओरड सुरू झाली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले गेले. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली झालेली महापालिकेपासून ते लोकसभेची प्रत्येक निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वाची कसोटी म्हणूनच पाहिली गेली. उद्धव यांनी ही सगळी आव्हाने परतावून लावली. आपल्या स्वभावाला साजेसे शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिले.

uddhav thakre first day

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला टक्कर देत २०१४ ला स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले तेव्हाच वरून संयमी आणि शांत वाटणारा हा नेता खुप कणखर आणि चिवट आहे, यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यांचे राजकीय कसबही वाखाणण्यासारखेच आहे. दगाबाजी करणाऱ्या भाजपशी त्यांनी पुन्हा एकदा हातमिळवणी केली. भाजपशी पुन्हा युती करण्याच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड टीकाही झाली. खुद्द राज ठाकरे यांनीही त्यावेळी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली. याआधीच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेला फारसे स्थान नव्हते. त्याची सल उद्धव यांच्या मनात कायम होती. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभेच्या वेळी युती करताना उद्धव यांनी सत्तेचे समान वाटप या प्रस्तावाचा आग्रह धरला. यामुळेच भाजपला पेचात पकडता आले. भाजपने हा प्रस्ताव मान्य केला. मात्र, समान वाटपात मुख्यमंत्रिपदाचंही वाटप आहे का, यावरून दोन्ही पक्षांमध्ये दुरावा आला आणि युती पुन्हा तुटली. काहीही झाले तरी शिवसेना काँग्रेससोबत जाणार नाही या भ्रमात भाजपचे नेते राहीले आणि त्यांच्या या भ्रमाचा भोपळा उद्धव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक देवून फोडला. त्यातून अजूनही भाजपचे नेते सावरलेले नाहीत.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्रिपद घेऊन शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल, असाच सर्वांचा अंदाज होता. सत्ता नसेल तर शिवसेना फुटेल वगैरे वावड्याही उठल्या. सत्तेच्या धुंदीत भाजप नेत्यांना अंडर करंटचा अंदाज आला नाही. त्यांनी आपण शिवसेनेची सहज फरफट करू, असे गृहीत धरले होते. मात्र काहीही झाले तरी मुख्यमंत्रिपद मिळवायचेच, असा चंग शिवसेनेने बांधला होता. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिलेदाराच्या माध्यमांतून मोर्चेबांधणी केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण दिले. भाजपच्या दगाबाजांना बेसावध ठेवत गनिमी कावा करून शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी कधी जुळवून घेतले याचा पत्ताच कोणालाही लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे खरे किंगमेकर ठरले. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मन वळवून मोट बांधली आणि भाजपला धोबीपछाड बसली.

तेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीचे नवे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले आणि मातोश्रीवर बसून ठाकरेशाहीची हुकूमत चालवणाऱ्या ठाकरे कुटूंबाची पावले वर्षा बंगल्यावर पडली. ठाकरे पिता पुत्रांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात प्रवेश करून एका वर्षात त्यांच्याबाबतच्या अनेक मतप्रवाहांना धुळ चारली आहे. विधिमंडलाचे कामकाज, प्रशासकीय कारभार कसा चालतो यासह विविध खात्यांच्या कारभारात खोलात जावून त्यांनी अभ्यास केला आहे. पर्यटन खाते लाभलेल्या आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या खात्यात अभ्यासपूर्ण आणि अमुलार्ग बदल घडवले आहेत. अभ्यासू वृत्ती, विनम्रता आणि कामातील सातत्य यामुळे पितापुत्रांकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन बदलला आहे. सोशल मीडिया आणि आधुनिक जगात वावरणारा सुशिक्षित युवा वर्गही त्यामुळे शिवसेनेकडे आकर्षित होतो आहे. निवडणुकीच्या धामधुमीनंतर तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या बांधावर पोहचलेले उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच कर्जमाफीचा निर्णय कणखरपणे घेतला आणि दिलेला शब्द आपण पाळतो हे दाखवून दिले.

To run Thackeray's birth party; They were not born to run the state; BJP leader's harsh criticism

काँग्रेससोबत जाण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबद्दल होणारी सुरुवातीची खळखळ आता जवळपास संपुष्टात आली आहे. जन्माला आलेली ही नवी आघाडी महाराष्ट्रातील जनतेने आणि राजकीय पंडितांनी स्वीकारली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, अतिवृष्टी आणि पूराचा फटका, करोना महासाथीचे संकट अशी एकामागोमाग एक आव्हाने त्यांच्यासमोर पहिल्याच वर्षात आली. करोनाचे आकडे आणि लॉकडाऊनच्या घोळावरून महाराष्ट्राच्या सरकारला विरोधीपक्ष सातत्याने धारेवर धरत आहे. एका बाजूला केंद्र सरकारकडून एक नव्या पैशाची मदत मिळत नाही तर दुसर्याध बाजूला ठाकरे सरकार अपयशी आहे. असा आरोप भाजप नेते करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सक्त वसूली संचलनालयाच्या (ईडी) जाळ्यात ओढण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूननच सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपचे नेते वेळोवेळी नको त्या मुद्यांचे राजकारण करत आले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे निवेदनही राज्यपालांना देण्यात आले आहे. भाजपच्या आमदार, खासदारांसह केंद्रातल्या भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंना टार्गेट केले जात आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार राज्य सरकारच्या नेतृत्वाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करताना आढळतात. कोरोनाचे गंभीर संकट हाताळण्यासाठी नेतृत्वाने धाडसी निर्णय घ्यायला हवेत असा फडणवीस यांचा आगृहं आहे. नेतृत्वाला गोंधळून टाकण्यात यशस्वी झाले तर त्याचा परिणाम सरकारच्या निर्णयक्षमतेवर होत असतो. गोंधळलेल्या नेतृत्वाकडून चुका अधिक होतात. त्याचा फटका सरकारमध्ये असलेल्या सगळ्यांनाच बसतो. हीच भारतीय जनता पक्षाची सध्या रणनीती असल्याचे दिसून येते. विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात सावरकर, राम मंदिर असे मुद्दे उपस्थित करून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला. सावकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेसची भूमिका वेगळी असताना शिवसेनेला भाजपने हिंदूत्ववादाशी तडजोड केली म्हणून हिणवले. तर राम मंदिराच्या मुद्यावरुनही शिवसेनेची अडचण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण हे दोन्ही विषय उद्धव ठाकरेंनी शिताफीने हाताळल्याने भाजपच्या हाती काहीच लागले नाही. मे महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करुन घेत नसल्याचे वक्तव्य केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातल्या बैठकीत काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. अशा घटनांनंतर भाजपकडून महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर महाविकास आघाडीची बैठकही मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे पार पडली. महाविकास आघाडीत संपर्क असून सर्वकाही आलबेल असल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सांगावे लागले. लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वनरला जाणार्या वादग्रस्त वाधवा कुटुंबाला प्रवासाचा परवाना कसा मिळाला यावरून राजकारण केले गेले, मात्र नंतर परवाना देणारे अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती फडणवीसांच्याच कारकिर्दीतील असल्याचे निष्पन्न झाले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनाही सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून झाला. कधी ठाकरे कुटुंबाच्या जमीन खरेदीवरून भाजपकडून किरीट सोमय्यांना अंगावर सोडले जाते तर कधी नारायण राणे आणि प्रविण दरेकर यांना आरोप करण्यासाठी पुढे केले जाते.

अशा या राजकीय, आर्थिक, नैसर्गिक आणि रोगराईच्या संकटातून महाविकास आघाडीचे नेते कसा मार्ग काढणार हा प्रश्नण संर्वांना आहे. मात्र नेहमीच सर्वांचे अंदाज चुकवणारा हा नेता कशी मुसंडी मारेल हे आत्ताच सांगता येणार नाही. राजकारणातील सत्तासंपत्तीच्या दलालांना मिळमीळीत वाटणारा हा नेता वर्षभरात सामान्य जनतेला मात्र नक्कीच भावला आहे. त्यांची सरळ साधी बोलण्याची शैली जनतेला पटली आहे हे मान्य करावे लागेल.

– राजा आदाटे