गणेशोत्सवाला कोरोनाची झळ

गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या दरम्यान १० दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असत. महाआरती होत असे. कोरोनामुळे यंदा या गोष्टीवर विरजण पडले आहे. त्यामुळे काही मंडळांनी यंदा बाप्पाला विराजमन न करता १० दिवस वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. जेणेकरुन कोरोनाबाबत जनजागृती होईल. तसेच ते सर्वसामान्य नागरिकांना होता होईल तेवढी मदतही करत आहेत.

गणोशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्र आणि परदेशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासकीय पातळीवर काही कठोर निर्णय घेतले जात आहेत. ते निर्णय सार्वजनिक मंडळेही पाळत आहेत. काही मंडळाने गणपती दीड दिवसाचे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही गणेश मंडळांनी गणपती न बसण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार काही मंडळांनी नियमांचे पालन करुन छोटे मंडप घातले आहेत. त्यातच बाप्पाला मोठ्या थाटात विराजमान केले आहे. दर्शनास येणाऱ्या गणेश भक्तांचे थर्मल गनने तापमान तपासून एका एकाला दर्शनास सोडत आहेत. तर दुसरीकडे काही गणेश मंडळांनी मोठा मंडप न घालता मंडळाच्या कार्यालयात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.

गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या दरम्यान १० दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असत. महाआरती होत असे. कोरोनामुळे यंदा या गोष्टीवर विरजण पडले आहे. त्यामुळे काही मंडळांनी यंदा बाप्पाला विराजमन न करता १० दिवस वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. जेणेकरुन कोरोनाबाबत जनजागृती होईल. तसेच ते सर्वसामान्य नागरिकांना होता होईल तेवढी मदतही करत आहेत.

गणेशोत्सव म्हणजे सर्व नागरिकांसाठी उत्साह, आनंदोत्सव असतो. नागरिक गणरायाचे आगमन धुमधडाक्यात करतात. सार्वजनिक गणेश मंडळे वेगवेगळया पद्धतीची सजावट करुन गणरायाचे आगमन वाजत गाजत करतात. दरवर्षी मंडळांमध्ये चढाओढ पाहायला मिळायची. प्रत्येक मंडळात सजावटीत स्पर्धा असायची. प्रत्येक मंडळ सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करायचे. कोणी देखावा करायचे नाहीतर १५ मिनिटाची चित्रफित बनवून लोकांना दाखवायचे. विविध संदेश पोहचवायचा प्रयत्न करत असतात. परंतु यंदा कोरोनामुळे ह्या गोष्टींना ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे.

गणेश मंडळात गणपतीच्या दर्शनासाठी अगदी पहिल्या दिवसापासून भक्तांची रिघ असायची पण यंदा ती हरवली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे भाविक कमी प्रमाणात दर्शनासाठी बाहेर येत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्यामुळे यंदाचे वर्षी गणेशोत्सवात मज्जा नसल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

“गणपती बाप्पा सुखकर्ता, दु:खहर्ता व विघ्नहर्ता आहे. गणरायाच्या आशीर्वादाने आपण कोरोना विषाणूवर मात करुन पुढच्या वर्षी वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमण करुन गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करुयात. बोला गणपती बाप्पा मोरया.”