नाताळ

ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात.

    नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत ख्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). ख्रिस्त महागुरुंना ख्रिस्तमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जातो. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे.

    दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा मिस्सा दिवसात अर्पण केला जात असे. मध्यरात्रीचा मिस्सा बेथलहेम येथे अर्पण केले जाते. हे इस्राईल देशातील एक छोटंसं गावं आहे. याच गावात ख्रिस्तांचा (प्रभू येशू) जन्म झाला. या दिवशी इथून लोकं रात्रीच्या समयी मिरवणूक काढून जेरूसेलम गांवी पहाटेच्या सुमारास पोहोचतात. तिथे दुसरा मिस्सा अर्पण केला जातो. नंतर दिवसा महामंदिरात सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र होतात, त्यावेळी तिसरा मिस्सा अर्पण होत असे.

    नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

    जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

    वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ज्या एका अनमोल सुवर्णक्षणासाठी इस्राएली जनता आतुरतेने थांबलेली होती. तो क्षण शेवटी जवळ आला. देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी राहत असलेल्या जोआकिम आणि ॲना या संतद्वयाच्या पोटी एका निष्कलंक कुमारिकेला जन्माला घातले. पवित्र मारियेचा जन्म ही मानवाच्या तारणाची मंगल पहाट होती. अजूनही नीतिमत्तेचा सूर्य जगावर तळपण्यास अवकाश होता. पुरेशा वयात आल्यावर जोकिम आणि आन्ना यांनी आपली सुकन्या योसेफ नावाच्या सुताराला दिली. दोघांची सोयरीक झाली. परंतु विवाह समारंभांआधीच मारिया गरोदर असल्याचे दिसून आले. ती पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झाल्याचे स्वप्नातील दर्शनाद्वारे एका दूताने योसेफाला सांगितले. मोठ्या आनंदाने त्याने मारियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.

    योगायोगाने त्याच वेळी सीझर ऑगस्टस याने साऱ्या जगाची नावनिशी लिहिली जावी अशी आज्ञा केली. योसेफ हा बेथलेहेम या गावचा असल्याने त्याने आपल्याला वाग्दत्त असलेली मारिया हिलाही आपल्या बरोबर घेतले. तेथे पोहोचल्यावर तिचे दिवस भरले. परंतु, सर्व उतारशाळा (धर्मशाळा) भरल्या होत्या. त्यामुळे गाईच्या गोठ्यात त्यांनी आसरा घेतला. तिथेच मारियेने आपल्या पुत्राला जन्म दिला. मानव होऊन देव माणसात वस्ती करू लागला. स्वर्गीय देवदूतांनी आपल्या राजेशाही थाटात त्यांच्यासाठी गायन गायिले. मेंढरे राखणाऱ्या मेढपाळांनी दिव्य बाळाचे दर्शन घेतले. पूर्वेकडच्या विद्वान लोकांनी येशू बाळाचा शोध घेऊन त्याला नमन केले.

    कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किंवा गायीचा गोठा तयार करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा संत फ्रान्सिस असिसिकर याने १२२३ साली सुरू केली. ग्रेसिओ नावाच्या एका लहान गावाजवळ असलेल्या गुहेमध्ये त्याने खरी गाय, उंट, मेंढरे, गाढवे इ. आणून असा देखावा निर्माण केला. त्याद्वारे लोकांना देवाच्या अपार दयेची व ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. ही प्रथा गावातील लोकांनी पूर्वापार पाळत ठेवली. असे म्हणतात की त्या वेळी संत फ्रान्सिस याने पवित्र मिस्सा अर्पण केली व लोकांना भावस्पर्शी प्रवचन दिले. त्या प्रवचनाच्या शेवटी या संताच्या हातात खरोखरच एक जिवंत बालक अवतरल्याचे लोकांनी पहिले. त्यामुळे गोशाळा उभारण्याच्या प्रथेला आणखी बळकटी मिळाली. अकराव्या व बाराव्या शतकात ख्रिसमस कॅरॉल किंवा नाताळ गीतांची प्रथा जर्मनीत सुरू झाली. दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. ख्रिसमस ट्रीचा अधिक सविस्तर उल्लेख १६०५ मध्ये आढळतो.

    नाताळ या सणाला एक सांस्कृतिक सण म्हणून ही बघितलं जातं. या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.

    बीके नीताबेन

    bkneetaa24@gmail.com