पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून करा गणपतीची सजावट

गणेशोत्सव म्हणल्यावर एक वेगळाच उत्साह सर्वांच्या मनात तयार होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणपती बाप्पा च्या आगमनाची ओढ लागलेली असते.

गणेशोत्सव  म्हणल्यावर एक वेगळाच उत्साह सर्वांच्या मनात तयार होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणपती बाप्पा च्या आगमनाची ओढ लागलेली असते. पण श्रावण सुरू झाला की ही ओढ जास्त निर्माण होत जाते. मग गणपती बाप्पाची मूर्ती कशी घ्यायची, कुठून घ्यायची, डेकोरेशन किंव्हा सजावट म्हणून काय काय करायचे, मखर बनवायचे असेल तर ते कशा पद्धतीने बनवावे लागेल असे अनेक प्रश्न डोक्यात आपोआप सुरू होतात. 

या वर्षीचा गणेशोत्सव हा खूप आगळा वेगळ्या पद्धतीचा आहे. याच कारण आहे देशभरात थैमान घातलेला ‘कोरोना’. असे असले तरी गणेशभक्तांचा उत्साह मात्र नेहमी प्रमाणेच आहे. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने असला तरी घरचा गणपती मात्र प्रत्येक जण तेवढ्याच हौशीने बसविणार हे मात्र नक्की…

आपल्या याच  घरातील गणपतीची सजावट विलोभनीय व आकर्षक कशी होईल, असा प्रश्न बहुतेक अनेकांना पडत असेल. आणि याच  विचारातून नवनवीन कल्पना आकारास येत असतात. पर्यावरण पूरक गणेशोस्तव साजरा करताना प्रामुख्याने शाडू मातीच्या मूर्ती बसवण्याचा आग्रह करावा.  घरातील सजावट म्हणजे जागेचा प्रश्न आलाच, त्यासाठी मोजक्या आणि ठरलेल्या जागेत प्रत्येकजण आपापल्या कल्पतेनुसार सजावट करीत असतो. आज फुलांमध्येसुद्धा देशी-विदेशी पर्याय उपलब्ध असल्यामुळे नैसर्गिक ओरिजनल फुलांची सजावट करण्यामध्ये लोकांचा कल वाढलेला आहे. जलबेरा, ऑर्चिड, गोल्डन, रजनीगंधी, ह्यंसारखी फुले जरी महाग असली तरी तीन/ चार दिवस ती ताजी टवटवीत राहातात. त्यामुळे ती अधिक सोयीची त्याचप्रमाणे आकर्षक दिसतात. 

 तसेच गणपतीच्या मागे उजळ रंगाची प्लेन भिंत असेल तर बाजारात मिळणारी विविध रंगी फुलपाखरे त्यावर चिटकवून भिंतीला आकर्षक बनवू शकता. किंवा पारदर्शक कागद मूळ आकार असणाऱ्या फुलपाखरांच्या प्रिंट घेऊन त्या कात्रीने नीट कापावे व टू-वे टेपने भिंतीवर चिटकवल्यास हे खरे भासतील.

पुठ्ठ्यापासून अनेक प्रकारचे मखर देखील आपण बनवू शकतो.