विशेष लेख : स्वातंत्र्य दिन, कोरोना आणि बरंच काही

कोरोनाने लोकांच्या जीवनात नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान प्रवेश केला. हळूहळू त्याने संपूर्ण विश्वात आपले बस्तान बसवले. जानेवारीत तो भारतात आला. मार्चमध्ये टप्प्याटप्याने सर्वत्र टाळेबंदी करावी लागली कारण त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्याने आपलंसं केलं.

कोरोनाने लोकांच्या जीवनात नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान प्रवेश केला. हळूहळू त्याने संपूर्ण विश्वात आपले बस्तान बसवले. जानेवारीत तो भारतात आला. मार्चमध्ये टप्प्याटप्याने सर्वत्र टाळेबंदी करावी लागली कारण त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्याने आपलंसं केलं. आजच्या या स्वातंत्र्यदिनी आम्ही सगळीकडे मुक्त संचार करण्याऐवजी घरात बसलो आहोत. याला फक्त आणि फक्त कोरोनाच जबाबदार आहे.

आजचा हा स्वातंत्र्यदिन आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. आज आम्हाला दरवर्षी सारखं स्वातंत्र्य यंदा सेलिब्रेट करता येणार नाही कारण आम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. आजच्या दिवशी सर्वसामान्य जनता ध्वजारोहण केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडते कारण याच दिवशी आमच्याकडे ‘सबसे सस्ते दिन’ म्हणून सेल असतो आणि यात मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट मिळत असल्याने ते खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडते. ‘बिग बझार’ सारखे मोठे मॉल्सच्या ठिकाणी अगदी जत्रेचं स्वरुप आलेलं असतं.

सबसे सस्ते दिनमध्ये सामन्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी या ठिकाणी अगदीच नाममात्र दरात उपलब्ध असतात. प्रत्येकजण आपला खिसा पाहूनच या गोष्टी खरेदी करतो पण यंदा हे चित्रच दिसणार नाही कारण मॉल्स बंद असल्याने आम्ही सर्वजण याला मुकलो आहोत. या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांच्या आनंदावर कोरोनाने विरजण घातल्याने लोकांच्या जगण्यातला आनंदच हिरावून घेतला आहे. खरेदी झाल्यावर किंवा करण्यापूर्वी एखाद्या सिनेमाला हजेरी लावणारे सर्वसामान्य आज दिसणार नाहीत कारण आज आम्ही तसे वागलो तर आम्हाला या स्वातंत्र्यदिनी १४ दिवस सगळ्यांपासून दूर पारतंत्र्यात (विलगीकरणात) रहावं लागणार आहे आणि आम्हाला हे नको आहे म्हणून आज आम्ही घराबाहेरच पडणार नाही आहोत. आज जरी ऑनलाइन खरेदीची सुविधा असली तरी तरी सामान्य माणसाच्या अवाक्यात आलेली नाही. जर ऑनलाइन खरेदी करायची असेल तर प्रत्येकाकडेच अँड्रॉइड मोबाइल किंवा लॅपटॉप, कंप्युटर अशी साधनं त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सामान्य माणूस या फंदात न पडता अशा सेलच्या ठिकाणी आवर्जून भेट देतो पण यावर्षी हे घडणार नाही. 

आजचा हा स्वातंत्र्यदिन सरकारी पातळीवरच साजरा होताना आम्ही फक्त तो टीव्ही वर पाहण्याचा आनंद घेत स्वत:ला धन्य मानणार आहोत. काल तसाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून संदेश दिला असून त्याची श्रवणभक्ती आम्ही केली आहेच पण आज आम्हाला पंतप्रधान मोदीजीही या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून काही उपदेशपर गोष्टी सांगणार आहेत. त्याही आम्ही घरात बसूनच कानसेन असल्यासारख्या ऐकणार आहोत आम्ही जर आज घराबाहेर पडलो आणि आम्हाला तुझी लागण झाली तर त्यानंतरचे भोगावे लागणारे परिणाम आम्हाला नको आहेत. म्हणून आज आम्ही घरात राहूनच या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ध्वाजारोहण सोहळे टीव्हीवर पाहण्यातच धन्यता मानणार आहोत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे चित्र बदलेल अशी आशा करूया आणि येत्या प्रजासत्ताक दिनाला आपण जे आज मिस करत आहोत या सर्व गोष्टींचा आनंद नव्या जोमाने घेऊया यासाठी सर्वांना शुभेच्छा.

जय हिंद!!!