
आज मनुष्य आपल्या एक सारख्या बदलणाऱ्या मूडलासुद्धा कंट्रोल करू शकत नाही. कित्येकदा आपण मूड नसेल तर जेवत नाही, कोणाशी बोलत नाही, एखाद्या कामाला सुद्धा नाही म्हणतो. हे मूड म्हणजेच आपली मनोस्थिती. जो व्यक्ति स्वतःच्या विचारांचा स्वामी बनतो तोच सर्व काही मॅनेज करू शकतो. स्व-प्रबंधन म्हणजेच सर्वप्रथम आपण आपल्या विचारांचे प्रबंधन करणे.
आपण साजरी दिवाळी साजरी करतोय. कित्येक दिवस स्वतःवर ठेवलेले नियंत्रण या दिवसांमध्ये तोडले असेल. गोड पदार्थ खाल्ल्यावर स्वतःला दोष ही दिला असेल व आता मात्र पुढे हे पदार्थ नाही खाणार अशी मनात गाठ ही मारली असेल हो ना? आजच्या आधुनिक आणि विज्ञान युगामध्ये मनुष्य व्यक्ति आणि वस्तू या दोघांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थी वर्ग सुद्धा टाइम मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट… असे अनेक मॅनेजमेंट कोर्सेस करीत आहे. हे सर्व करताना जर जीवनातील तणाव व स्वतःला मॅनेज करण्याची कला मात्र त्याला येत नाही.
एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा संस्थेला आपण जेव्हा भेट देतो, मग ती शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक किंवा अध्यात्मिक संस्था असो त्याचे कार्य बघून आपण म्हणतो कि ‘काय ह्या संस्थेचं मॅनेजमेन्ट आहे!’ व्यक्ति किंवा कार्याला पद्धतशीरपणे हाताळणे सहज आहे पण स्वतःला शिस्तबद्ध ठेवणे कधी-कधी कठीण असतं. आज मनुष्य आपल्या एक सारख्या बदलणाऱ्या मूडलासुद्धा कंट्रोल करू शकत नाही. कित्येकदा आपण मूड नसेल तर जेवत नाही, कोणाशी बोलत नाही, एखाद्या कामाला सुद्धा नाही म्हणतो. हे मूड म्हणजेच आपली मनोस्थिती. जो व्यक्ति स्वतःच्या विचारांचा स्वामी बनतो तोच सर्व काही मॅनेज करू शकतो. स्व-प्रबंधन म्हणजेच सर्वप्रथम आपण आपल्या विचारांचे प्रबंधन करणे. कोणतेही कार्य करण्याआधी त्या कार्याची समज, त्याचा अनुभव आणि त्याला पार पाडण्यासाठी एखादी नवीन योजना या सर्व घटकांचा एकत्र ताळमेळ असेल तर ते कार्य सहज संपन्न होते. पण ते करणारा व्यक्ति स्वतःच्या विचारांमध्ये त्यांची मांडणी व्यवस्थित आखत असेल तरच ते वास्तविकात येऊ शकते. नाहीतर कार्य वेळेवर पार पडत नाहीत.
जीवनात यशस्वी होणे म्हणजे फक्त शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा उंचावणे नाही पण आपले संबंध, व्यवहार, चरित्र ह्यांना सुद्धा तितकेच महत्व द्यायला हवे. एखादा व्यक्ति आपल्या जीवनाचे ध्येय डॉक्टर, वकिल, क्रिकेटर, आयएएस ऑफिसर बनून निश्चित ध्येयापर्यंत पोहोचतोसुद्धा पण जीवनाच्या बाकीच्या बाजू विस्कटलेल्या दिसतात.
आज मोबाईलच्या माध्यमाने एकाचवेळी अनेक गोष्टी आपण करत असतो पण त्याची बॅटरी थोड्या थोड्या वेळाने डाउन होते, मनुष्याचे सुद्धा तसेच आहे. कामाचे ओझे वाढले कि जीवनाची घडी मोडायला सुरुवात होते. मग ते शरीर, मन, संबंध सर्वांवर त्याचा परिणाम होतो. आपल्याला संपूर्ण सुख व शांति हवी असेल तर माझ्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे? हे पहिले शोधायला हवे. शरीर, व्यक्ति, धन, प्रगती हे जीवनात आवश्यक वाटतात. पण प्रत्येक वेळी एकाच गोष्टीला प्राधान्य देऊन चालत नाही. या सर्वांना सांभाळण्यासाठी मनाचे संतुलन हवे. भूत- भविष्य, बौद्धीक आणि भावनात्मक संतुलन असावे लागते. परिस्थितीची समज ठेवून त्याला युक्तीने हाताळण्याची कला आपल्यामध्ये हवी.
‘management’ अर्थात ‘man + age + men + t’ आपण तीन ‘M’ ना manage करतो. मार्केट, मटेरियल, मशीन यांना तर manage करतो. पण ‘M’ अर्थात man म्हणजेच दुसऱ्यांना manage करण्याआधी स्वतःला manage करायला हवे. ‘एज’ अर्थात इथे फक्त शरीराचे वय नाही परंतु ‘एज’ अर्थात साहस किंवा आत्मविश्वास (courage). आपण दुसऱ्यांना सांगण्याचे साहस ठेवतो कि काय, कसे करायला हवे पण त्याच बरोबर आपण स्वतःच्या कर्मेंद्रियांना सुद्धा कसे नियंत्रित करावे याची समज सुद्धा असावी. ‘एज’ म्हणजे ‘परिपक्वता’ (maturity) तसेच ‘अनुभव’ ही आहे. ‘अनुभव आपला सर्वात मोठा शिक्षक आहे.’ पण प्रत्येक वेळी तोच अनुभव कामी येईल असे नाही. परिस्थिती, वातावरण या सर्वांना समजूनच आपण पुढे पाऊल उचलावे.
रोज आपल्यासमोर नवीन समस्या उपस्थित होतात. बदलणाऱ्या या परिस्थितींमध्ये साहस, परिपक्वता तसेच रचनात्मक अनुभवांबरोबर आपण स्वतःला manage करावे. स्व-प्रबंधन करण्यासाठी व्यक्तिगत योजना मॉडल (planning model) बनवणे गरजेचे आहे. रोजच्या कामाची यादी बनवावी. त्यामध्ये आज मुख्य व आवश्यक काय हे नीट समजून घ्यावे. त्या अनुसार विचारांना सकारात्मक ठेवण्यावर ही आपला कल असावा कारण कधी-कधी योजनेअनुसार करता आले नाही तरी ही आपली मानसिकता बिघडते. दृढता आणि शक्तिशाली विचार आपल्याला दिवसभर कर्म करण्यास मदत देतात. ‘स्व-प्रबंधन’ म्हणजेच जी विचारांमध्ये योजना बनवली आहे त्याला वास्तविकात उतरवणे. जर कधी ते शंभर टक्के नाही करू शकले तर दुःखी, उदास, तणावग्रस्त न होता, दुसऱ्या दिवशी ते पूर्ण करण्यावर लक्ष्य ठेवणे. दैनंदिन कार्य सुरळीत पार पडली तरीसुद्धा आपण आपले लक्ष्य साधू शकतो.
चला तर मग यशाचे स्वप्न साकारण्यासाठी स्वतःच्या विचार, वेळ, योजनांची मांडणी बनवूया आणि त्या अनुसार स्वतःलाच शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करू या.
– नीता बेन