एकनाथ शिंदे संवेदनशील मुख्यमंत्री

प्रेरक नेता, शेतकऱ्याचा मुलगा, अनाथांचा नाथ, कार्यकर्ता प्रतिनिधी, राज्यातील लोकप्रिय लोकप्रिय नेतृत्त्व, बाळासाहेबांच्या विचारांचा वारस यांसारख्या अनेक उपाधी असलेले 'जनतेचा नेता' एकनाथ शिंदे आहे. सर्वात आधी त्यांना माझ्याकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

    प्रेरक नेता, शेतकऱ्याचा मुलगा, अनाथांचा नाथ, कार्यकर्ता प्रतिनिधी, राज्यातील लोकप्रिय लोकप्रिय नेतृत्त्व, बाळासाहेबांच्या विचारांचा वारस यांसारख्या अनेक उपाधी असलेले ‘जनतेचा नेता’ एकनाथ शिंदे आहे. सर्वात आधी त्यांना माझ्याकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

    जनतेचा नेता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत ते एकमेव असे मुख्यमंत्री आहेत की ते सर्वसामान्य जनतेला थेट भेट देतात. त्यामध्ये कोणतीही सुरक्षेची आडकाठी नसते. ते शिष्टाचाराने बोलतात. आज राज्यातील जनतेला वाटते की त्यांचा मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना लोकांच्या समस्यांची जाण आहे. त्यांच्या समस्यांचा समाधान त्याच तत्परतेने करतात.

    जनतेच्या प्रति ते संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते गेल्या 6 महिन्यांपासून काम करत आहेत. त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ना भूतकाळ आणि ना भविष्यकाळ त्यांच्यासारखा मुख्यमंत्री होणार नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या नेतृत्त्वात राज्यातील जनतेला ‘आपलं सरकार’ आल्यासारखं वाटत आहे.

    त्यांच्या मंत्रिमंडळात मला उद्योगमंत्री मिळाले आहे. त्यामध्ये जनतेच्या फायद्याचे असे अनेक निर्णय घेण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून एक क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. वास्तविक, शिवसेना आणि भाजपची युती खरी युती होती. मात्र, शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला निर्णय योग्य नव्हता. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा देखील नव्हता.

    जनादेशचा अपमान करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. भाजपसोबत मिळून माननीय एकनाथ शिंदेजींचे सरकार बनवणे हा क्रांतीकारक निर्णय होता. सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्ष खालच्या पातळीवरून टीका करत आहे. आम्ही त्यांना उत्तर देऊ शकतो. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही विरोधकांना विकासाकामातून उत्तर देऊ. राज्यातील जनतेने आमच्यावर जी जबाबदारी टाकली आहे. त्याचा सन्मान करणे आहे, हे देखील आमचं कर्तव्य आहे.

    – उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य.