नाथाभाऊ ‘ती’ सीडी लावणार का?

पक्ष सोडल्यानंतर आपल्यामागे इडी लागेल अशी भीतीही त्यांनी बोलून दाखविली होती. 'तुम्ही माझ्या मागे ईडी लावाल तर मी सीडी लावेल' असा सूचक इशारा खडसेंनी दिला होता. मुद्दा असा की, आता जर खरंच ईडीची नोटीस पाठविली तर नाथाभाऊ 'ती' सीडी लावणार का? हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे.   

एकनाथ खडसे (eknath khadse) यांना इडीची नोटीस (ED notice) अशी बातमी प्रश्नार्थक चिन्हासह सध्या सर्वच माध्यमांवर ब्रेकिंग न्यूज म्हणून चालत आहे. स्वतः एकनाथ खडसे यांनी तूर्तास तरी या बातमीचे समर्थन केले नाही, तर दुसरीकडे ईडीनेही याबद्दल काही अधिकृत भाष्य केलेले नाही. ईडीच्या नोटीसचे हे ‘पिल्लू’ माध्यमांमध्ये कोणीतरी सोडले आणि प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावर सुरु झाला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर विनयभंगाचा खटला दाखल केला होता. दमानिया यांच्याबद्दल खडसेंनी केलेले विधान हे अत्यंत आक्षेपाहार्य होते. २ सप्टेंबर २०१७ रोजी मलकापूर येथे एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजित एका कार्यक्रमात त्यांची जीभ घसरली, आणि नेत्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दमानिया यांनी खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या सर्व प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण करावी अशी खडसेंची इच्छा होती, परंतू प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता फडणवीसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या सर्व प्रकरणात खडसे यांची प्रतिमा मालिन झाली आणि भाजपावरची नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविली. तब्बल ४० वर्षे भाजपात घालविल्यानंतर एकनाथ खडसे यांनी २२ ऑक्टोबर २०२० ला भाजपाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.  यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीसांबद्दलचा राग स्पष्ट बोलून दाखविला. पक्ष सोडल्यानंतर आपल्यामागे इडी लागेल अशी भीतीही त्यांनी बोलून दाखविली होती. ‘तुम्ही माझ्या मागे ईडी लावाल तर मी सीडी लावेल’ असा सूचक इशारा खडसेंनी दिला होता. मुद्दा असा की, आता जर खरंच ईडीची नोटीस पाठविली तर नाथाभाऊ ‘ती’ सीडी लावणार का? हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे.