संकटमाेचक गिरीश महाजनांवरच प्रश्नचिन्ह! ; जळगावात भाजप का पाेळला?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने खडसेंना शह देण्यासाठी गिरीश महाजन यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षात खान्देशातील एक नवे नेतृत्त्व तयार करण्याचा प्रयत्न झाला. अल्पावधीत ते भाजपाचे संकटमाेचक म्हणून प्रसिद्धही झाले. मात्र ही प्रसिद्धी केवळ फुग्यातील हवाच हाेती, हे आज सिद्ध झाले. त्यांच्या नेतृत्त्वात इतकी धमक असती तर त्यांनी जळगावसारखी माेठी आणि खान्देशच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व असलेली जळगाव महापालिका हातून जाऊ दिली नसती किंवा नगरसेवकांनीही तशी हिमंत केली नसती.

  नीलेश अलई, जळगाव : भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान्देशात भाजपाला आज खऱ्या अर्थाने जबर धक्का बसला. जळगाव महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही महापाैरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन आणि उपमहापाैरपदी कुलभूषण पाटील निवडून आले. अर्थात शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी भाजपाच्या ३१ आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांना गळाला लावून भाजपाचे तथाकथित संकटमाेचक गिरीश महाजन यांना ‘पाणी’ पाजले. खान्देशच्या राजकारणाचा हुकमी एक्का फक्त एकनाथ खडसेच आहेत, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.

  कागदावरच संकटमाेचक!
  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने खडसेंना शह देण्यासाठी गिरीश महाजन यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षात खान्देशातील एक नवे नेतृत्त्व तयार करण्याचा प्रयत्न झाला. अल्पावधीत ते भाजपाचे संकटमाेचक म्हणून प्रसिद्धही झाले. मात्र ही प्रसिद्धी केवळ फुग्यातील हवाच हाेती, हे आज सिद्ध झाले. त्यांच्या नेतृत्त्वात इतकी धमक असती तर त्यांनी जळगावसारखी माेठी आणि खान्देशच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व असलेली जळगाव महापालिका हातून जाऊ दिली नसती किंवा नगरसेवकांनीही तशी हिमंत केली नसती. अर्थात यामागे अनेक कारणेही असतील. पण महापालिकेतील पक्षाची सत्ता जाण्याची नामुष्की भाजपावर ओढावल्याने गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे येत्या काळात त्यांना खान्देशातील राजकारण करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल.

  नाशिक मनपाच्या तिजाेरीवर लक्ष
  नाशिक महापालिकेतील स्थायी समितीचे सभापतीपद मिळवून पाठ थाेपटून घेणाऱ्या गिरीश महाजनांना जळगाव महापािलकेची सत्ता राखता आली नाही. नाशिक महापालिकेची पुढच्या वर्षी निवडणूक असल्याने येथील स्थायी समिती सभापतीपदाला जास्त महत्त्व प्राप्त झाले हाेते. मात्र आपलं साेडून दुसऱ्याचं पाहण्यात घरचं कधी गमावलं हे त्यांनाही समजले नाही.

  खडसेंनी दाखवला इंगा!
  खडसेंविषयी वेगवेगळ्या वल्गना करणाऱ्या खडसेंनी आज जळगाव महापालिकेतील सत्तांतरात अप्रत्यक्षरित्या महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जळगाव महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसल्याने शिवसेनेला खडसेंनी मदत केली. ७५ नगरसेवक असलेल्या जळगाव महापालिकेत शिवसेनेचे १५ नगरसेवक हाेते. राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसल्याने राष्ट्रवादीला या सत्तेत सहभागी हाेता आले नाही. सत्तांतर घडवायचे तर सध्याचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला साथ देऊन भाजपाला धक्का देण्याचा पवार-खडसे यांचा डाव यानिमित्ताने यशस्वी झाला.

  अति आत्मविश्वास नडला
  खडसे गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही, असे किती आले आणि किती गेले, पण पक्ष मजबूत हाेत रािहला, असा अतिरेकी आत्मविश्वास दाखवणे महाजन आणि भाजपाला जळगावात महागात पडले. केवळ कुणाच्या गळ्यातील ताईत बनल्याने पक्षाचे नेतृत्त्व करता येत नाही तर त्यासाठी अंगी गुण असावे लागतात, हेदेखील भाजपासारख्या माेठ्या पक्षाच्या नेत्यांना कळू नये, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

  महाजनांना राेखणार काेण?
  देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी म्हणून भाजपात ओळखल्या एकनाथ खडसे यांचे खच्चीकरण करण्यासाठी गिरीश महाजन यांना प्राेत्साहन देण्यात आले, हे उघड आहे. मात्र त्यांना खडसेंइतके सक्षम नेतृत्त्व करता आले नाही, हेही तितकेच खरे आहे. खडसेंनी भाजपाला रामराम ठाेकल्यानंतर भाजपाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांनी टाेकाच्या भूमिका घेतल्या हाेत्या. त्याचवेळी भाजपाने पुढचा धाेका ओळखून निर्णय घेणे अपेक्षित हाेते; मात्र फडणवीसांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या महाजनांना राेखणार काेण? हा प्रश्न भाजपा नेत्यांपुढे हाेता. त्याचाच परिपाक म्हणून आज भाजपाला जळगावच्या महापालिकेची सत्ता साेडावी लागली.

  स्वपक्षीयांकडूनच भ्रष्टाचाराचे आराेेप
  खडसेंनी पक्ष साेडल्यानंतर काही दिवसांतच जळगाव महापािलकेतील नगरसेवकांमध्ये असंताेष पसरू लागला हाेता. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केवळ ठेकेदारांचीच घरे भरण्याचे काम केल्याचा उघड आराेप तत्कालीन भाजपाचे नगरसेवक आणि विद्यमान उपनगराध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी वारंवार केला हाेता. जनतेला आश्वासनांचा गाजर दाखवून सत्ता मिळविली मात्र प्रत्यक्षात कामे मात्र काहीच झाली नसल्याची तक्रारही अनेक नगरसेवकांनी पक्षनेतृत्त्वाकडे केली हाेती. मात्र एका व्यक्तीिवशेषाच्या प्रेमात पडलेल्या नेत्यांना या तक्रारींकडे लक्ष देणे महत्त्वाचे वाटले नाही, हेदेखील भाजपाच्या अंगलट आले, असे म्हणण्यास वाव आहे.

  एकंदरीत जळगाव जिल्ह्यातून भाजपाला उखडून टाकेल, या खडसेंच्या भीमगर्जनेचा पहिला ट्रेलर आज रिलीज झाल्याचे म्हणता येईल. यापुढे आता खडसे अजून किती धक्के देतात, याचा विचार भाजपा नेते करतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.