स्किझोफ्रेनिया : एक मानसिक आजार

स्किझोफ्रेनिक व्यक्तीच्या उपचाराचा एकमेव उददेश म्हणजे पुनर्वसन आणि समाजातील एक क्रियाशील व्यक्ती म्हणून त्यांना प्रस्थापित करणे . शेवटी आशावाद महत्वपूर्ण आहे आणि रुग्ण , कुटुंबातील सदस्य आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांनी हे लक्ष्यात ठेवण्याची गरज आहे कि, बऱ्याच रुग्णांचा बरा होण्याचा मार्ग सहज सोपा असतो .त्यातील आव्हानांना सामोरे जाणं फार कठीण नसतं आणि रुग्णांमध्ये बरेच वैयक्तिक सामर्थ असतात ज्यांना ओळखण आणि समर्थन करणं आवश्यक असत .

  -चारुशीला सा .कडू , समुपदेशक आणि क्लिनिकल, सायकॉलॉजिस्ट, पुणे

  स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार असून तो बाकी इतर आजारासारखाच आहे मात्र समाजामध्ये या आजाराबद्दल जे अनेक गैरसमज आहे किंवा जे अज्ञान आहे ते दूर व्हावे हाआजार म्हणजे भूतबाधा नाही , त्याचेउपचार मांत्रिकाकडे नाही तर मानसोपचारतज्ञाकडे होतो त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी संपूर्ण जगभरात २४ मे रोजी ‘ स्किझोफ्रेनिया जनजागृती दिवस ‘ साजरा केला जातो प्रत्येक १०० व्यक्तीच्या मागे १ व्यक्ती हि स्किझोफ्रेनियानेग्रासित आहे.

  काय आहे स्किझोफ्रेनिया ?
  स्किझोफ्रेनिया हि एक मानसिक विकृती आहे. ज्यामध्ये धारणा , विचार, मनस्थिती आणि वागण्यात लक्षणीय बदल झालेले आढळतात .यामध्ये आपल्याला काही सकारात्मक म्हणजे ठळकपणे दिसून येणारी आणि नकारात्मक म्हणजे लवकर लक्ष्यात न येणारी तसेच आपल्या विचारांशी संबंधित लक्षणे आढळतात.यात व्यक्तीला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भास होतात जसं कुणीही आजूबाजूला नसतांना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात, काही वेळेला विशिष्ट चवीचा भास होतो, वास्तविक परिस्थितीत उपस्थित नसलेल्या गोष्टी दिसतात,कधीकधी काही लोकांना सुगंध किंवा घाण वास सतत येत राहतो, कुणाचा तरी स्पर्श जाणवत राहतो किंवा काहींना वाटतं कि, आपल्या भावना किंवा विचार हे आपले नाहीच आहे तरीही त्याआपल्याला अनुभवायला येतायेत , कुणीतरी त्यांच्या मनात जबरदस्तीने काही विचार टाकतायेत , कुणीतरी आपल्या विरोधातआहे, वाईटावर आहेत किंवा आपल्याला मारून टाकणार आहे असंही या व्यक्तीला सतत वाटत राहतं शिवाय आपण कुणी तरी मोठी असामीआहोत , आपल्याकडे विशिष्ट अशी दैवीशक्ती आहे. असंही यांना वाटत असतं . यांच्या विचारांमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ असलेला दिसतो आणि तो त्यांच्या बोलण्यातून सतत आपल्याला जाणवतो. ह्या व्यतिरिक्त एकटे राहणे स्वमग्न असणे,कुठल्याही गोष्टीत आनंद न वाटणे किंवा नातेसंबंध नीट जपता न येणे ,नैराश्य तसेच शाब्दिकओघ,स्मृती , तर्क, समस्या निराकरण , स्मरणशक्ती यांच्यामध्येदेखील समस्या उत्त्पन्न झालेली दिसून येते. याशिवाय विनाकारण संशय घेणे, एकट्यात बडबड करणे, झोप न लागणे,घरातून निघून जाणे , घाणेरडे राहणे ,अंघोळ न करणे ,खराब कपड़े घालणे,कचरा वेचणे आणि बऱ्याचदा यांच्यामध्ये आत्महत्येचे प्रमाणही आपल्याला आढळून येते.

  एकंदरीत कायतर या आजारात स्पष्टपणे विचार करण्याची , वाटण्याची आणि वागण्याची क्षमता प्रभावित केलेली आढळते.स्किझोफ्रेनिया होण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे अनुवंशिकता ,आपल्या आजूबाजूची तणावात्मक परिस्थिती आणि मेंदूतील रसायनांमधील बदल .या आजाराबाबत अनेकांमध्ये अनेक भागात वेगवेगळे गैरसमज आढळून येतात जसे भूतबाधा झाली आहे , कुठल्यातरी आत्म्याने शरीरात प्रवेश केलाय , कुठला तरी कोप झालाय , हि लोकं सामान्य लोकांसाठी जास्त धोकादायक आणि हिंसकअसतात , हि बेघर असतात यांना सतत वेड्यांच्या दवाखान्यात ठेवावं लागतं . मात्र असं नाहीये हा आजार म्हणजे कुठलीही भूतबाधा किंवा कोप नसून मेंदूतील रासायनिक बदलामुळे किंवा ताणजन्य परिस्थिती सांभाळता न आल्यामुळे झालेला एक मानसिक आजार आहे जो योग्य औषधोपचाराने पूर्णतः बरा होऊ शकतो.शिवाय हि लोकं हिंसक किंवा धोकादायक नसतात तर आपण त्यांना समजून घ्यायला कुठेतरी कमीप डतो . त्यांनाप्रेमाची भावनिक आणि मानसिक आधाराची गरज असते ज्यामुळे त्यांना आजारातून बाहेर पडायला मदत होते.

  खरंतर या आजाराबद्दल असलेल्या अनेक गैरसमजुतीमुळे समाज एका कलंकित दृष्टिकोनातून या आजाराकडे बघतो शिवाय समस्याग्रस्त व्यक्तीचे कुटुंब आणि व्याधिग्रस्त व्यक्ती यांना ही याचा त्रास होतो त्यामुळे या आजारावरील कलंक नाहीसा करण्यासाठी आणि व्याधिग्रस्त व्यक्तीला एक सदृढ मानसिक आरोग्य मिळावे या करीता आपण सगळ्यांनी जागृततेच्या कार्यात पुढे यायलाहवे . त्यासाठीआपल्याला नेमके काय करता येईल,रुग्ण व्यक्तीच्या मानसिक आजाराबद्दल त्याच्यादृष्टीने महत्वाचे काय आहे याबद्दल आपण नक्कीच विचार करायला हवेत. आणि त्यासाठी चार महत्वाच्या गोष्टी आपल्याला ,रुग्णव्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना अमलात आणाव्या लागतील.

  १. स्वीकृती – स्किझोफ्रेनिया हा एक इतर आजारांसारखा आजार आहे आणि तो बरा होणारा आहे .त्यामुळे या आजाराला आणि त्यामुळे बाधित व्यक्तीला दूर
  न सारता त्याला व्यक्ती म्हणून स्वीकारा
  २. स्वकलंक आणि कलंक – हा आजार होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात .हि कुठल्याही चुकीची शिक्षा नाहीये त्यामुळे या बद्दल वाईट वाटू न घेणे , अपराधी वाटून घेणे , स्वतःला कमी लेखणे हे कुटुंबांनी आणि व्याधिग्रस्त व्यक्तीने दूर करायला हवे.
  ३. योगदान – याआजाराबाबतीतयोग्यतीजनजागृतीकरणेव्यक्तीबराव्हावायासाठीत्यालायोग्यउपचारउपलब्धकरूनदेणे .
  ४. तोलामोलाचा पाठिंबा – मानसिक ,भावनिक , कौटुंबिकआधारदेणे .

  या चार गोष्टींद्वारे नक्कीच आपण एक सदृढ मानसिक आरोग्य एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो .

  या आजारात औषधोपचाराबरोबरच याव्यक्तीचे पुनर्वसन होणेसुद्धा अत्यावश्यक असते जेणेकरून आजारातून बाहेर आल्यानंतर त्यांना उत्पादनक्षम आणि फायद्याचे जीवन जगता यावे .आणियासाठीत्यांनासमर्थनआणिमदतीचीआवश्यकताअसते . तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींना जीवन कौशल्ये , व्यवस्थापनविकसितकरण्यासाठी व्यावसायिक किंवा शैक्षणिक प्रशिक्षणपूर्ण करण्यास आणि नोकरी मिळवून देण्यासाठी पुनर्वसनाचा फायदा होतो .त्याचबरोबर विविध प्रकारच्या सायको थेरपीसुद्धा त्यांना आजार व्यवस्थापित करण्यास आणि त्यांचे जीवन सुधारण्यास मदत करते . यात त्यांना मानसिकआधार , सामाजिक कौशल्येशिकण्यास , तणावाचा सामना करण्यास मदत मिळते . बऱ्याच लोकांसाठी स्किझोफ्रेनिया कौटुंबिक सहकार्याने जगणे त्यांच्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विशेष महत्वाचे आहे . कुटुंबियांना त्यांची माहिती देणे आणि त्यांचे समर्थन करणेदेखील आवश्यक आहे .

  शिवाय काही गोष्टी लक्ष्यात ठेवणे आवश्यक आहे

  – स्किझोफ्रेनिया आजारावर उपचार उपलब्ध आहे , त्यासाठी औषधे उपलब्ध आहेत आणि त्यांचे योग्य सेवन आवश्यक आहे .
  -अर्धवट माहितीच्या आधारे औषधांमध्ये फेरबदल केल्यास किंवा बंद केल्यास हा आजार पुन्हा परत
  येऊ शकतो .
  -स्किझोफ्रेनिक व्यक्तीच्या योग्य देखरेखीसाठी त्याच्याशी मानवीय व्यवहार आवश्यक आहे या व्यक्तीबाबत आपलेपणा ठेवा वा त्यांचा अपमान करू नये किंवा त्यांची मजा घेऊ नये
  -त्यांना बंद खोलीत बांधून ठेवून त्यांना सामान्य सुविधांपासून वंचित ठेऊ नका

  स्किझोफ्रेनिक व्यक्तीच्या उपचाराचा एकमेव उददेश म्हणजे पुनर्वसन आणि समाजातील एक क्रियाशील व्यक्ती म्हणून त्यांना प्रस्थापित करणे .
  शेवटी आशावाद महत्वपूर्ण आहे आणि रुग्ण , कुटुंबातील सदस्य आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांनी हे लक्ष्यात ठेवण्याची गरज आहे कि, बऱ्याच रुग्णांचा बरा होण्याचा मार्ग सहज सोपा असतो .त्यातील आव्हानांना सामोरे जाणं फार कठीण नसतं आणि रुग्णांमध्ये बरेच वैयक्तिक सामर्थ असतात ज्यांना ओळखण आणि समर्थन करणं आवश्यक असत .

  -चारुशीला सा .कडू , समुपदेशक आणि क्लिनिकल, सायकॉलॉजिस्ट, पुणे