अल्पसंख्याकांसाठी स्वयंरोजगार

अल्पसंख्याक संवर्गातील उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या काही योजना 'मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ' राबवत असते. या योजनांचा लाभ मुस्लीम, शीख, पारसी, बौध्द, ख्रीश्चन, जैन आणि ज्यू संवर्गातील व्यक्तींना मिळू शकतो.

  अल्पसंख्याक संवर्गातील उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या काही योजना ‘मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ’ राबवत असते. या योजनांचा लाभ मुस्लीम, शीख, पारसी, बौध्द,  ख्रीश्चन, जैन आणि ज्यू संवर्गातील व्यक्तींना  मिळू शकतो.

  महामंडळाच्या योजना
  (१) उन्नती मुदत ठेव योजना- या अंतर्गत दोन प्रकारे कर्ज पुरवठा केला जातो. (अ) कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी एक लाख २० हजार रुपये व ग्रामीण भागासाठी ९८ हजार रुपये असल्यास, उमेदवारांना २० लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. याचा व्याजदर, ६ टक्के. यावरील हमी शुल्‍क २ टक्के मिळून एकूण व्याज दर ८ टक्के.
  (ब) कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये असणाऱ्या उमेदवारांना ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज  दिलं जातं. याचा व्याजदर पुरुष उमेदवारासाठी ८ टक्के. यामध्ये २ टक्के हमी शुल्‍काचा समावेश केला जाऊन व्याजदर १० टक्के होतो. महिला उमेदवारांसाठी व्याजदर ६ टक्के. यामध्ये २ टक्के हमी शुल्‍काचा समावेश केला जाऊन व्याजदर ८ टक्के होतो. कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षे.
  अटी व शर्ती
  (१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. (२) कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचे किमान वय १८ वर्षे असावे. (३) तो साक्षर असावा. सामान्य अर्जदाराचं कमाल वय ४५ वर्षे व विधवा उमदेवाराचं वय कमाल ५० वर्षे असावं.
  अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
  (१) पासपोर्ट आकाराचं रंगीत छायाचित्रं, (२) ओळखपत्र (निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड किंवा पारपत्र किंवा आधारकार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना. यापैकी कोणतेही एक.) (३) निवासाचा दाखला किंवा पुरावा (आधारकार्ड किंवा पारपत्र किंवा वाहन चालवण्याचा परवाना, विद्दूत देयक, निवडणूक ओळखपत्र किंवा अधीवास प्रमाणपत्र. यापैकी कोणतेही एक.) (४) प्राधीकृत व्यक्तीने  दिलेला उत्पनाचा दाखला (५) जन्म  दाखला (शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा पारपत्र) (६) आधारकार्ड (७)  व्यवसायासाठीचं साहित्य किंवा सामानाचं दरपत्रक (८) व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा किंवा दुकानाचा पुरावा (९) बँक पासबुकाची छायांकित प्रत.
  (२) सूक्ष्म पतपुरवठा योजना
  याअंतर्गत दोन प्रकारे कर्ज पुरवठा केला जातो. (अ) कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी एक लाख वीस हजार रुपये व ग्रामीण भागासाठी ९८ हजार रुपये असल्यास, स्वयंसहाय्यता गटाच्या प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये याप्रमाणे गटास २० लाखापर्यंत कर्ज  दिलं जातं. याचा व्याजदर  ७ टक्के असून हमी शुल्‍क २ टक्के. असं एकूण ९ टक्के व्याजदर होतो.
  (ब) कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये असणाऱ्या उमेदवारांच्या गटातील, प्रत्येक सदस्यास दीड लाख रुपये याप्रमाणे ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज  दिलं जातं. याचा व्याजदर पुरुष उमेदवारासाठी १० टक्के. यामध्ये २ टक्के हमी शुल्‍काचा समावेश  केला जाऊन व्याजदर १२ टक्के होतो. महिला उमेदवारांसाठी व्याजदर ८ टक्के. यामध्ये २ टक्के हमी शुल्‍काचा समावेश केला जाऊन व्याजदर ८ टक्के होतो.  कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षे.
  अटी व शर्ती
  (१) या स्वयंसहाय्यता गटात किमान दहा व कमाल २० सदस्य असायला हवेत. (२) हा गट महिला आर्थिक विकास महामंडळाच्या साहाय्यानं स्थापना झाला असावा किंवा या महामंडळाशी संलग्न असावा. (३) सर्व सदस्य महाराष्ट्राचे अधिवासी (डोमेसाईल) असावेत. (४) किमान ७० टक्के सदस्य अल्पसंख्याक समुदायातील असावेत. (५) सर्व सदस्यांचे वय १८ वर्षांपेक्षा अधीक असावे. (६) गटाचे सचीव व अध्यक्ष साक्षर असावेत.
  अर्जासोबत   जोडावयाची कागदपत्रे
  (१) गटातील सर्व सदस्यांचं पासपोर्ट आकाराचं रंगीत छायाचित्रं (२) गटातील समुहाचं एकत्रित छायाचित्र, (३) सर्व सदस्यांचं ओळखपत्र (निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड किंवा पारपत्र किंवा आधारकार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना. यापैकी कोणतेही एक.) (४) निवासी दाखला (आधारकार्ड किंवा पारपत्र किंवा वाहन चालवण्याचा परवाना, विद्दूतदेयक, निवडणूक ओळखपत्र किंवा  अधीवास प्रमाणपत्र. यापैकी कोणतेही एक.) (५) प्राधीकृत व्यक्तीने दिलेला, गटातील सर्व सदस्यांचा उत्पनाचा दाखला (६) स्वंयसहाय्यता गटाच्या बँक पासबुकाची छायांकीत प्रत (७) गेल्या सहा महिन्यातील बैठकीचा अहवाल (८) कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं असल्यास किंवा शासनाचं आर्थीक साहाय्य लाभलं असल्यास त्याची माहिती (९) गेल्या तीन वर्षातील लेखा (अकाउंट) विषयक माहिती (१०) गटातील सर्व सदस्यांची माहिती (वय/ जात/ व्यवसाय)
  या दोन्ही योजना  केंद्र सरकारच्या सहकार्यानं राबवल्या जातात.
  संपर्क- दुसरा मजला, डी.डी.बिल्डींग, जुने जकात घर शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई-४०००२३, दूरध्वनी- ०२०-२२०८२०८९१, संकेतस्थळ-mamfdc.maharashtra.gov.in

  – सुरेश वांदिले