विशेष लेख : स्वातंत्र्य दिन आणि कोरोना परिस्थिती

देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. सर्व दुकाने तिरंग्याने सजलेली पहायला मिळतात. तसेच रस्त्यांवर तिरंग्याच्या पताका लावलेल्या असतात. प्रत्येक शाळेत तसेच संस्थात्मक कार्यालयांत मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करुन साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा आणि संस्थात्मक कार्यालये ओस पडली आहेत.

आज देशात ७४ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. परंतु सर्व नागरिकांच्या आनंदावर कोरोनाने विरजण घातल्याचे दिसत आहे. जग प्रगती करत पुढे पुढे जात असताना कोरना महामारीने विकासाला विळखा घातल्याने विकासाची गती धीमी झाली आहे. तसेच कोरोना विषाणुच्या संर्गामुळे देशातील काही क्षेत्रातील प्रगती जलद गतीने होताना दिसत आहेत. 

देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. सर्व दुकाने तिरंग्याने सजलेली पहायला मिळतात. तसेच रस्त्यांवर तिरंग्याच्या पताका लावलेल्या असतात. प्रत्येक शाळेत तसेच संस्थात्मक कार्यालयांत मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करुन साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा आणि संस्थात्मक कार्यालये ओस पडली आहेत. तो उत्साह कुठेतरी हरवलेला दिसत आहे. आजही त्या कार्यालयांत ध्वजारोहण झाला पंरतु ती ध्वजारोहण करण्यासाठी शिस्तमय गर्दी कुठेतरी हरवली होती. तसेच शाळांत परेड करण्यासाठी जमलेली मुलेच नसल्याने शाळा ओस पडल्या होत्या. जमले होते ते चार-पाच मुख्य अधिकारी त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण पार पाडण्यात आला. सर्व कार्यक्रम रितसर झाला परंतु स्वातंत्र्यादिन साजरा करण्यासाठी असणारा उत्साह कोरोनामुळे हिरमुसला गेला होता. 

शाळांतील ध्वजारोहण पाहण्यास होणारी प्रेक्षकांची गर्दी, बघ्यांची गर्दीही ह्या वर्षी हरवली होती. कोरोनामुळे माणसांतील संपर्क दुरावला आहे. त्यामुळे गर्दी होताच माणसे दूर व्हायला लागली आहेत. दरवर्षी स्वातंत्र्य दिनी तरुण वर्ग, तसेच प्रौढ आणि युवा ध्वजारोहण करण्यास एकत्र यायचे. जणू काही मोठा सणच साजरा करत आहेत. असा उत्साह त्यांच्या मुखावर दिसून यायचा परंतु कोरोनामुळे हाच उत्साह आता कुलूपबंद झाल्याचे दिसत आहे. 

कोरोनामुळे जगात अनेक बदल झाले. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. कोरोनामुळे देश आत्मनिर्भरतेच्या वाटेवर प्रवास करत आहे. अनेक संकटांशी सामना करत आत्मनिर्भरतेच्या वाटेवर देशाचा प्रवास सुरुच आहे. नागरिकही मोठ्या उत्साहात आत्मनिर्भर भारत करण्यासाठी योगदान देत आहेत. कोरोनाने आत्मनिर्भर होण्यासाठी मोठी संधी निर्माण केली आहे. कोरोनाचे जगाला फायदे तसेच तोटेही दाखवून दिले आहेत. तसेच कोरोना विषाणूने जगातील सर्व मानवजातीला निसर्गाचे महत्त्व पटवून दिले आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीबद्दल मानवांत आदर आणि प्रेम भावना निर्माण केली आहे. तसेच निसर्ग किती गरजेचा आहे हे देखील कोरोनाने दाखवून दिले आहे. 

कोरोना विषाणूने भारतीय संस्कृतीतही मोठा बदल केला आहे. तसेच भारतीय हिंदू संस्कृतीची प्रचिती करुन दिली आहे. कोरोनामुळे नागरिक स्वतःहून घरी बसले आहेत. घरातील व्यक्तींशी चर्चा करत आहेत. जिव्हाळ्याच्या नात्याला पालवी फुटली आहे. बाहेरुन आल्यावर हात, पाय स्वच्छ करत आहेत. स्वतःचे काम स्वतःच करत आहेत. त्यामुळे आत्मनिर्भरतेचे धडे घरीच गिरवले जात आहेत. घरातील मंडळी जवळून समजायला लागली आहेत. कोरोनामुळे घरात बसलेली पुरुष मंडळी घरातील कामांत मदत करत आहेत. त्यांना घरातील कामांचाही त्रास समजत आहे. त्यामुळे कित्येक कुटूंबातील वाद मिटले आहेत. कोरोनाने जसे आपल्याला वाईट बाजू दाखवली आहे. तशीच त्याची चांगली बाजूही दाखवली आहे. कोरोनामुळे जगातील सर्व देश आता भारताच्या संस्कृतीप्रमाणे भेटल्यावर हात मिळवणे सोडून एकमेकांसमोर हात जोडत आहेत. स्वातंत्र्य दिना निमित्त भेटणारे सर्व नागरिकही सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत आहेत. 

 

– स्वप्निल जाधव (प्रतिनिधी)