dance movement therapy workshop

एम्पॉवरने मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी नुकतेच डान्स मुव्हमेंट थेरपीचा वर्कशॉप आयोजित केला होता. लोकांना याच्यामुळे स्वतःला जाणून घेण्याची संधी मिळाली. आपल्या शरीरात आपल्या आजुबाजूला घडलेल्या घटनांमुळे अनेक भावना साठून राहतात. डान्स मुव्हमेंट थेरपीमुळे तुम्ही त्या भावना व्यक्त करु शकता.

  लोकांना त्यांचे मानसिक आरोग्य जपता यावे म्हणून आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एम्पॉवर संस्थेने पुढाकार घेतलाय. मुंबईत एम्पॉवरने २९ जुलैला डान्स मुव्हमेंट थेरपीच्या फ्री वर्कशॉपचे आयोजन केले होते. या वर्कशॉपमध्ये एम्पॉवरच्या मानसशास्त्र तज्ज्ञ विशाखा सोढाणी यांनी डान्स मुव्हमेंट थेरपीच्या माध्यमातून लोकांना मानसिक आरोग्य कसे जपता येते याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या वर्कशॉपच्या निमित्ताने आर्ट बेस्ड थेरपीचा एक भाग असलेल्या डान्स मुव्हमेंट थेरपीविषयी त्यांनी अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.

  विशाखा सांगतात की, आर्ट बेस्ड थेरपी ही एक्स्प्रेसिव्ह थेरपी आहे. डान्स, आर्ट, गेम्स, ड्रामा ही त्यातली माध्यमे आहेत. या सगळ्या माध्यमांची मिळून आर्ट्स बेस्ड थेरपी तयार होते. माणसाच्या गरजेनुसार ही माध्यमे वापरून थेरपी दिली जाते. कोणत्या थेरपीच्या मार्गाने एखादा माणूस जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकेल हे आम्ही जाणून घेतो. मग त्यानुसार योग्य ती थेरपी त्या माणसासाठी वापरतो.

  डान्स मुव्हमेंट थेरपी कुणासाठी उपयुक्त आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना विशाखा यांनी सांगितले की, ही थेरपी सगळ्या प्रकारच्या वयोगटासाठी उपयुक्त आहे. मुळात डान्स एक संवाद साधणारी भाषा आहे. आपण आपल्या कृतीतून काही गोष्टी दाखवत असतो. त्यामुळे लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकासाठी ही उपयुक्त आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला डान्स येण्याची गरज नाही. एम्पॉवरने मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी नुकतेच डान्स मुव्हमेंट थेरपीचा वर्कशॉप आयोजित केला होता. लोकांना याच्यामुळे स्वतःला जाणून घेण्याची संधी मिळाली. आपल्या शरीरात आपल्या आजुबाजूला घडलेल्या घटनांमुळे अनेक भावना साठून राहतात. डान्स मुव्हमेंट थेरपीमुळे तुम्ही त्या भावना व्यक्त करु शकता. तुमच्या मुडनुसार तुमच्या मुव्हमेंट्स(हालचाली) होत असतात. डान्स मुव्हमेंट थेरपीमुळे तुम्ही स्वतःच स्वतःला बरं करु शकता. स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. लोकांना या गोष्टीची माहिती नसते. लोक वर्कशॉपमध्ये येतात तेव्हा सांगतात की, आम्ही स्वतःला बरे करू शकतो आणि त्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही हे तुमच्यामुळे आम्हाला समजले आहे.

  विशाखा पुढे म्हणाल्या की, डान्स मुव्हमेंट थेरपी अशी आहे की ज्यात तुम्ही स्वतःवर काम करता. ही थेरपी मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स, डिप्रेशन अशा त्रासांपासूनही सुटका मिळवण्यासाठी वापरली जाते. थोडक्यात डान्स मुव्हमेंट थेरपी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. इतर डान्स प्रकार आणि या डान्स मुव्हमेंट थेरपीत हाच फरक आहे. माणसाचा आत्मविश्वास वाढावा, त्याचा मानसिक त्रास कमी व्हावा अशा प्रकारची ध्येय समोर ठेऊन आम्ही ही थेरपी प्लॅन करतो. झुम्बासारखे डान्स प्रकार तुम्हाला शारिरिकदृष्ट्या फिट ठेवण्यासाठी आहेत. डान्स मुव्हमेंट थेरपी तुम्हाला मानसिकदृष्ट्या फिट ठेवण्याचे काम करते.

  विशाखा यांनी सांगितले की, स्ट्रेस आणि रागाचे व्यवस्थापन करण्यासाठी ही थेरपी उपयुक्त आहे. तुम्ही रागात असाल तर जोरात हालचाली कराल. त्यातून तुमचा राग तर बाहेर पडेल पण कुणाला त्रास न देता तुम्ही हे करता. ही थेरपी असे औषध आहे ज्याचे हार्मफुल इफेक्ट्स नाहीयेत. तुमच्या हालचालीतून भावनांचा निचरा करण्यासाठी डान्स मुव्हमेंट थेरपी चांगला पर्याय आहे. एम्पॉवरच्या https://mpowerminds.com/ वेबसाईटवर तुम्हाला मानसिक आरोग्य जपण्यासाठी आम्ही करत असलेल्या गोष्टींची माहिती मिळू शकेल. लोक आमच्या वर्कशॉप्समध्ये सहभागी होऊ शकतात.

  – साधना दिपक राजवाडकर
  sanarajwadkar@gmail.com