सन्मान एक दिवसापुरता का? दररोज व्हायला हवा!

    सोलापूर : डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाई यांना पाठवलेल्या पत्रात स्त्रियाची प्रगतु व मुक्तीसाठी संघर्ष करणारा मी योध्दा आहे, असे म्हटले आहे .तर स्त्रिवरील अत्याचार दूर करण्यासाठी वापरलेले अस्त्र म्हणजे कायदा..या कायद्मामुळे आज स्त्री सुरक्षित, सुशिक्षित झाली व सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्व करु लागली त्यामुळे  ८ मार्च जागतीक महिला दिन जसा सन्मानाने साजरा केला जातो तसा ३६५ दिवस व्हायला हवा.

    स्त्रियाचे उद्धारक भारतात पुष्कळ झाले. परंतु कैवारी मात्र एकच झाला.ते म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.त्यांनी माता रमाईंना पाठवलेल्या एका पत्रात स्त्रियांच्या प्रगती व मुक्तीसाठी संघर्ष करणारा मी योद्धा आहे, ते सर्वार्थाने सत्य आहे. दोन्ही हाती शस्त्र घेऊन, महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणारा असा योद्धा पुन्हा होणे नाही. कायद्याचे शस्त्र एका हाती तर चळवळीचे शस्त्र दुस-या हाती,हे सर्व भारतीय महिलांनी मानले पाहिजे. आपल्या ६५ वर्षांच्या उण्यापुऱ्या आयुष्यात लढणाऱ्या योद्ध्याने राजकीय, सामाजिक, आर्थिक व धार्मिक अशी चारही शस्त्रे पादाक्रांत केली. परंतु या पराक्रमाला जोड होती करुणेची, महिला आणि शूद्रादी प्रजेवर पराकोटीच्या जातीय व्यवस्थेने केलेल्या अन्याय अत्याचाराचा राग व त्या पिळवणुकीला बळी पडलेल्यां विषयी करुणा, यातून बाबासाहेबांनी या देशात सामाजिक क्रांती केली. तथागत बुद्धाने केलेल्या क्रांतीनंतर ही दुसरी महत्त्वाची सामाजिक क्रांती होय. सर्व प्रकारच्या विषमतेपैकी एक म्हणजे स्त्री-पुरुष विषमता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी वापरलेले महत्त्वाचे अस्त्र म्हणजे कायदा.आज त्यांच्या घटना व कायद्यामुळे स्त्री सुरक्षीत झाली, शिक्षणासाठी सरसावली,सुशिक्षित झाली.आज स्त्रि प्रत्येक क्षेत्रात तेवढ्याच आत्मविश्वासाने, आवडीने, पुरूषापेक्षा सरस ठरली आहे

    शासनाने देखील महिलांना सन्मान स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ ऐवजी ५० टक्के आरक्षण दिले.आज संधी मिळालेल्या महिलांनी त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.चुल आणि मुल सांभाळणारी स्त्री अशी समजली जाणारी आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत नव्हे तर एक पाऊल पुढे काम करीत आहे.कोणत्याही क्षेत्रात आज स्त्री मागे नाही तरीही तिचा केवळ ८ मार्च जागतीक महिला दिनी सन्मान करण्याऐवजी प्रत्येक वर्षातील ३६५ दिवस सन्मान केला तरच तिचा आणखी मनोधैर्य वाढेल.

    -रजनी भडकुंबे सभापती, पंचायत समिती उत्तर सोलापूर