बॉलिवू़ड अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाची लागण

अर्जुन कपूरने कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत दिली आहे. सध्या अर्जुनला कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. तो घरीच विलगीकरणात राहिला आहे.

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिकांपासून ते चित्रपटसृष्टितील अनेक मंडळी सापडले आहेत. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाची लागण झाली आहे.

अर्जुन कपूरने कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत दिली आहे. सध्या अर्जुनला कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. तो घरीच विलगीकरणात राहिला आहे.

अर्जुन कपूर यांने त्याच्या पोस्टमध्ये लिहले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तुम्हाला सांगणं माझी जबाबदारी आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षण नाही आणि मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पूर्णपणे बरा होईपर्यंत घरातच विलगीकरणात आहे. माझ्या आरोग्याबाबत मी माहिती देत राहील असे त्याने सांगितले आहे.

View this post on Instagram

🙏🏽

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on