‘आशिकी’ फेम अभिनेते राहुल रॉय यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला; आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले

मुंबई : ‘आशिकी’ फेम अभिनेते राहुल रॉय यांना काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना आयसीयूमधून जनरल रुममध्ये हलविण्यात आले आहे.

‘आता ते धोक्यातून बाहेर आले आहेत आणि त्यांना काल अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

राहुल रॉय हे एल ए सी- लाइव्ह द बॅटल चित्रपटाचे कारगिलमध्ये शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्याठिकाणी शूटींग सुरु होते तिथले तापमान मायनस १५ डिग्री सेंटीग्रेड होते. वातावरणामुळे त्यांना हा त्रास झाला असेल अशी शक्यता त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली.